Tarun Bharat

सिल्वानगर-फोंडा येथे दुचाकीच्या अपघातात दोघजण गंभीर

प्रतिनिधी /फोंडा

सिल्वानगर-फोंडा येथे दोन दुचाकीच्या झालेल्या टक्करीत दोघेही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले. संदेश आचरेकर (42, रा. कासरवाडा-बेतोडा) व अल्ताफ शेख (22, दत्तगड बेतोडा) अशी गंभीर जखमींची नावे आहेत. गुरुवारी उशिरा रात्री बेतोडा निरंकालर रोडवरील भोलानाथ हॉलसमोर हा अपघात  घडला. फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जीए 05 एन 8968 मोटरसायकलस्वार फोंड्याहून बेतोड्याच्या दिशेने जात होता. सिल्वानगर येथे भोलानाथ हॉलसमोर अन्य एका वाहनाला ओव्हरटेक करीत असताना बेतोड्याहून फोंड्याच्या दिशेने येणाऱ्या दुचाकी जीए 05 एन 1137 अॅक्टिवाला जोरदार धडक दिली. त्यात अॅक्टिवा चालक गंभीर जखमी झाला. रुग्णवाहिका पोहचेपर्यंत सुमारे अर्धातास रक्तबंबाळ अवस्थेत तो रस्त्यावरच पडून होता. 108 रुग्णवाहिका घटनास्थळी पोहचल्यानंतर दोघा जखमींना फोंडा उपजिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. प्रकृती अस्वस्थतेमुळे तत्काळ दोघांनाही बांबोळी येथील गोमेकॉत रवानगी करण्यात आली. सध्या अल्ताफ याची प्रकृती सुधारत असून गंभीर जखमी झालेला संदेश अतिदक्षता विभागात उपचार घेत आहे.

 डिश टिव्ही दुरुस्तीसाठी येताना अपघात

संदेश हा बेतोडा व फोंडा भागात डिश टिव्ही ऑपरेटर म्हणून काम करीत आहे. कीर्ती हॉटेलजवळ एका ग्राहकाचे सिग्नल न मिळत असल्यामुळे बंद पडलेले डिश टिव्ही दुरूस्ती करण्यासाठी तो कासरवाडा येथून आपल्या एका मित्रांची दुचाकी घेऊन तो येत होता. अपघाताच्या केवळ 100 मिटर अंतरावर दुचाकीमालक मित्राला हॉटेलजवळ सोडून तो ग्राहकांच्या तक्रार निवारण करण्यासाठी जात असताना हा अपघात घडला. समोरून भरघाव वेगाने आलेल्या मोटरसायकलने दिलेल्या धडकेत त्याच्या पाय, छाती व डोक्याला मार लागला असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे. कासरवाडा येथे तो आपल्या पत्नी व दोन मुलांसह भाड्याच्या खोलीत राहत आहे. सध्या त्याची पत्नी त्याच्याबरोबर बांबोळी येथे असून दोघांही चिमुकल्या मुलांचे हाल झालेले आहे. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला असून हवालदार केशव सिनारी अधिक तपास करीत आहेत.

Related Stories

नाटय़ दिग्दर्शक शिवनाथ नाईक आज दूरदर्शनवर

Patil_p

काणकोण पालिकेचे बाजार संकुल परप्रांतियांच्या ताब्यात

Omkar B

पेडणे सार्वजनिक गणेशोत्सवाचे सुवर्णमहोत्सवात पदार्पण साधेपणाने व सरकारी नियम पाळून 11 दिवस साजरा होणार

Omkar B

राज्यात मटका व्यवसाय कायदेशीर करा- मंत्री मायकल लोबो

Patil_p

मुख्यमंत्र्यांसमोरही ‘गो बॅक आयआयटी’

Patil_p

तीन महिन्यांत खाण लिलाव

Amit Kulkarni