प्रतिनिधी /फोंडा
हवेली कुर्टी येथील एका भाडय़ाच्या खोलीत राहणाऱया महिलेचे सोन्याचे दागिने चोरीप्रकरणी फोंडा पोलिसांनी दोघां संशयितांना काल शुक्रवारी अटक केली आहे. यालानिंग बोमन्ना टोगारी (31, झिंगडीमळ कुर्टी मूळ बिजापूर) व चंद्रू विरप्पा उन्की (45, रा. हवेली, मूळ कर्नाटक) अशी संशयितांची नावे आहेत. चोरीची घटना रविवार 24 जुलै रोजी घडली होती. संशयिताकडून सुमारे 1 लाख रूपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहे.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुवर्णा सागर कैसरये या महिलेने याप्रकरणी रितसर तक्रार दाखल करण्यता आली होती. हवेली कुर्टी येथील नवजीवन इस्पितळाजवळ ती आपल्या एका अल्पवयीत मुलांसोबत राहत आहे. रविवार 24 रोजी दागिने घालून ठेवण्यात आलेला ढबा गायब झाल्याचे तिच्या निदर्शनास आले हेते. अज्ञातानी खोलीच्या दरवाजा तोडून प्रवेश घेतला होता. तिने प्रथमदर्शनी मुलांवर संशय घेतला, मात्र मुलांना नकार दिल्यानंतर महिलेने फोंडा पोलिसात तक्रार नेंदविण्यात आली. याप्रकरणी फोंडा पोलिसांना सखोल तपासाअंती यालानिंग हा दागिने विकण्याच्या बेतात गिऱहाईक शोधत असताना आढळला. त्य़ाला संशयावरून ताब्यात घेतलयानंतर पुढील चित्र स्पष्ट झाले. याप्रकरणी फोंडा पोलिसांनी दोघां संशयिताविरोधात भा.दं. सं. 454, 380 कलमाखाली गुन्हा नोंदवून पाच दिवसांच्या रिमांडवर पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक आदित्य वेळीप अधिक तपास करीत आहे.