शिरोळ/प्रतिनिधी
ट्रॉली चोरीप्रकरणी अवघ्या 36 तासाच्या आत शिरोळ पोलीस गुन्हे शोध पथकाने दोन आरोपींच्या मुस्क्या आवळून १६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात यश आले आहे.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, शिरोळ अर्जुनवाड रोडवरील बाबासो शेट्टी यांच्या मालकीच्या दोन ट्रॉल्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या होत्या. या प्रकरणी त्यांनी ट्रॉली चोरीची पोलिसात फिर्याद दाखल केली होती. शिरोळच्या न्हे शोध पथकाने सीसीटीव्ही फुटेच्या आधारे गणेश धनाजी माळी (वय २४) व सोमनाथ गजानन माळी (दोघे रा. कडेगांव जि. सांगली) यांना अटक करून त्यांच्याकडून १६ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपीकडून अन्य गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्या दृष्टीने पोलीस तपास करीत आहेत.
पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरिगिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विश्वास कुरणे, पोलीस कर्मचारी राजाराम पाटील, ताहिर मुल्ला, रहिमान शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली. अधिक तपास पोलीस करीत आहेत.