Tarun Bharat

कुलगाममधील चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

Advertisements

आरएसपुरा येथे घुसखोर ठार, डोडामध्ये एकाला अटक

श्रीनगर / वृत्तसंस्था

काश्मीरमधील कुलगाम जिह्यातील नौपोरा-खारपोरा येथील त्रुब्जीमध्ये सोमवारी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ठार झालेल्या दोन्ही दहशतवाद्यांची ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला असून रात्रीपर्यंत येथे शोधमोहीम सुरू होती. दुसरीकडे, सोमवारी पहाटे सुरक्षा दलांनी जम्मू विभागात पाकिस्तानकडून घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला. आरएसपुरा येथे बीएसएफच्या जवानांनी भारतीय हद्दीत एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केले. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. बीएसएफने मृतदेह ताब्यात घेऊन पोलिसांच्या ताब्यात दिला आहे. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे.

डोडा येथे एका दहशतवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी या दहशतवाद्याकडून एक चिनी पिस्तूल, दोन मॅगझिन, 14 काडतुसे आणि एक मोबाईल फोन जप्त केला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या भागात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई सुरू केली. या कारवाईत दहशतवाद्याला डोडा शहराच्या बाहेरील भागातून अटक करण्यात आली आहे.

Related Stories

भारत-नेपाळ यांच्यात प्रकल्प करार

Patil_p

पोटनिवडणुकांची आज मतमोजणी

Patil_p

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा

Omkar B

मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर नवा आरोप

Amit Kulkarni

”भाजप कार्यालयात महिलेवर अत्याचार, आवाज दाबण्यासाठी पीडितेवर मारहाणीचा आरोप”

Abhijeet Shinde

पंतप्रधान मोदी, शाह विरोधातील खटला रद्दबातल

Patil_p
error: Content is protected !!