Tarun Bharat

कुपवाडामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

Two terrorists killed in Kupwara जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिह्यातील नियंत्रण रेषेजवळ दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात सुरक्षा दल आणि काश्मीर पोलिसांना यश आले. दहशतवाद्यांकडील दोन एके 47 रायफल्स दोन पिस्तूल आणि 4 ग्रेनेड जप्त करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, कुपवाडामधील नियंत्रण रेषेजवळच्या माछिल भागात काही दहशतवादी घुसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानुसार सुरक्षा दल आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहिम हाती घेतली. माछिल भागातील एलओसी टेकरी नार येथे जवानांचा वेढा घट्ट होताच दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दलाने प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दोन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. ठार झालेल्या दहशतवाद्यांची नावे अद्याप समजू शकली नाहीत. त्यांच्याकडून दोन एके-47 रायफल, दोन पिस्तूल आणि 4 बॉम्ब जप्त करण्यात आले आहेत.

अधिक वाचा : अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयात सिलिंडरचा स्फोट; नवजात बालकांना इजा

Related Stories

इस्रोच्या 5 कर्मचाऱयांचा रस्ता दुर्घटनेत मृत्यू

Patil_p

आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी केंद्राच्या नव्या मार्गदर्शक सूचना जारी

datta jadhav

गुजरातमध्ये काँग्रेस, ‘आप’ला मोठा झटका

Patil_p

पुलवामामध्ये 3 दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p

पंजाब मंत्र्याची भ्रष्टाचारामुळे हकालपट्टी

Patil_p

शोपियां चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav