‘ऑपरेशन दोस्त’ची तुर्कीवासियांकडून प्रशंसा
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भूकंपग्रस्त तुर्कीमध्ये मदत आणि बचाव कार्यासाठी गेलेल्या एनडीआरएफच्या दोन टीम शुक्रवारी भारतात परतल्या. तुर्कस्तान आणि सीरियामध्ये 6 फेबुवारीला घडलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर भारताने ‘ऑपरेशन दोस्त’ अंतर्गत मदत पाठवली होती. भारताची विशेष पथके 10 दिवसांपूर्वी मदत आणि वैद्यकीय साहित्य घेऊन तुर्कीला गेली होती. त्यानंतर त्यांनी प्रत्यक्ष मदत व बचावकार्यात सहभाग घेतला होता. आता माघारी परतताना तुर्कीवासियांनी टाळय़ा वाजवून भारतीय पथकातील सैनिक-कर्मचाऱयांना निरोप दिला.
विनाशकारी भूकंपामुळे भूकंपग्रस्त भागात ढिगाऱयाखाली दबलेल्या लोकांना शोधण्यासाठी भारताने दोन्ही देशांकडे विविध उपकरणे पाठवली आहेत. भारताने पाठवलेल्या शोध आणि बचाव कर्मचाऱयांचे विविध गट मदतकार्यात गुंतले होते. विशेष प्रशिक्षित श्वान पथक, ड्रिल मशीन, मदत सामग्री आणि औषधे घेऊन भारतीय पथक एडन, तुर्की येथे दाखल झाले होते. भारताकडून तातडीने पाठवलेल्या या मदतीबद्दल तुर्कीने आभार मानले होते. भूकंपानंतर काही तासांतच भारताने या संकटात मदत करण्यासाठी तत्काळ पावले उचलली आणि बचाव पथके तुर्कीला पाठवण्याचा निर्णय घेतला होता.