वार्ताहर/ न्हावेली-
पार्किंग करुन ठेवलेली खाजगी बस न्यूट्रल होऊन उलटय़ा दिशेने मागे आल्याने वेत्ये येथे विचित्र अपघात घडला. बसच्या मागे काहि अंतरावर उभ्या असलेल्या दोन दुचाकी बसच्या मागील चाकाखाली आल्याने दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे.
याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहिती नुसार शुक्रवारी सकाळी 10.30 च्या सुमारास हा अपघात वेत्ये येथील कैलास ढाब्याजवळ घडला. हि खाजगी बस क्रमांक युपी 83 बीटी 3947 हि अचानक मागे आल्याने या बसच्या मागील बाजूस काहि अंतरावर उभ्या असलेल्या दोन दुचाकी बसच्या मागील चाकाखाली आल्याने या दोन्ही दुचाकीचे नुकसान झाले आहे. या अपघाताची मााहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थानी मोठी गर्दी केली. या अपघाताची मााहिती सावंतवाडी पोलिसांना कळवली असल्याचे समज