Tarun Bharat

…त्यानं सायलेन्सरचा आवाज काढला, मग पोलिसांनी त्याचा असा आवाज काढला

गोकुळ शिरगाव/प्रतिनिधी

घराच्या दारासमोर मोटरसायकलच्या सायलेन्सरचा कर्कश आवाजाचा लहान मुलांना त्रास झाल्याने आठ जणांविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज गुरुवार दि. 14 रोजी एकच्या सुमारास गाडीचा सायलेन्सर काढून कर्कश आवाज करत असताना घरातील लहान मुले या आवाजाला घाबरून मोठमोठ्याने रडत होती. यावेळी गाड्या दारात वाजवू नका असे सांगून सुद्धा हे मोटरसायकल चालक जास्तच आवाज करू लागले. या आवाजाचा त्रास होऊ लागल्याने वाद झाला. त्यामध्ये योगेश अरविंद कांबळे (वय30) रा. बेघर वसाहत, गोकुळ शिरगाव यांनी आठ जणांच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

संतोष गौतम कांबळे, सौरभ नंदकुमार कांबळे, अमित सुकुमार कांबळे, सनी सुकुमार कांबळे, गौरव नंदकुमार कांबळे, नंदकुमार पांडुरंग कांबळे, सुकुमार पांडूरंग कांबळे, काशिनाथ धर्मा कांबळे या आठ जणांविरोधात दारासमोर जोरात गाडी वाजवल्याने तसेच घरातील लहान मुलांना व इतरांना त्रास होत असल्याने योगेश कांबळे यांनी आपल्याला मारहाण सुद्धा केली या कारणावरून आठ जणांच्या विरोधात गोकुळ शिरगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला केला असून अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल शेख करीत आहेत.

Related Stories

कोल्हापूर : हुंड्यासाठी विवाहितेचा छळ, पतीसह दोघांवर गुन्हा

Archana Banage

मुलीचा लैंगीक छळ करणार्‍या बापाला पाच वर्ष सक्तमजुरी

Abhijeet Khandekar

गरजूंना धान्य वाटप हा पत्रकार संघाचा पॅटर्न सर्वत्र राबविण्याची गरज :आरोग्य राज्यमंत्री यड्रावकर

Archana Banage

राशिवडेत तोंडाला मास्क न लावणाऱ्यांकडून आठ हजारचा दंड वसूल

Archana Banage

ग्रामीण भागातील बसेसचा पुढील 10 दिवसांत निर्णय होणार

Archana Banage

स्पर्शविरहित स्वयंचलित तापमापक यंत्राची निर्मिती

Archana Banage