Tarun Bharat

दुचाकी चोरटे शहर पोलिसांच्या जाळ्यात

एक लाख रुपयांचा ऐवज हस्तगत, सातारा शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाची कारवाई

प्रतिनिधी/ सातारा

सातारा शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक अजंठा चौक परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना दोघेजण संशयास्पदरित्या फिरताना आढळून आले. त्यांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून दुचाकी व बॅटरी चोरीचे गुन्हे उघडकीस आले. प्रल्हाद शिवाजी पवार (वय 23, रा. अजंठा चौक गोपाळवस्ती सातारा), शिवाजी मल्हारी बुटे (वय 38, रा. अजंठा चौक) अशी त्या दोघांची नावे असून त्यांच्याकडून सुमारे एक लाख रुपयांचा आवाज हस्तगत केला आहे.

 याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहर पोलीस ठाण्याचे डीबी पथक अजंठा चौक परिसरात दि. 8 रोजी रात्री गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना दुचाकी चोरीतील सराईत युवक हा दुचाकीवरून संशयास्पदरित्या फिरताना आढळून आला. त्यास डीबी पथकाने ताब्यात घेतले. त्याच्याकडील दुचाकीबाबत विचारणा केल्याबद्दल त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्याची अधिक चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी ही वाढे येथील चोरीची असल्याचे सांगण्यात आले. तालुका पोलिसांकडून त्याबाबत माहिती घेतली असता गुन्हा दाखल असल्याचे स्पष्ट झाले. सराईत दुचाकी चोरटा असल्याने त्याची अधिक चौकशी पोलिसांनी केली असता सेव्हन स्टार येथून ही एक दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. तसेच त्याने साथीदाराच्या मदतीने ट्रकच्या बॅटऱया चोरी केल्याचे सांगितले. त्यादेखील पोलिसांनी हस्तगत केल्या.

ही कारवाई सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबीचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो. ना. सुजित भोसले, अविनाश चव्हाण, ज्योतिराम पवार, पंकज ढाणे, अभय साबळे, विक्रम माने, गणेश भोंग, सागर गायकवाड, गणेश घाडगे, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी केली आहे.

Related Stories

विश्वकोश कॉलनीत दीड लाखाच्या दागिन्यांची चोरी

Archana Banage

Karad Accident : यात्रेसाठी निघालेल्या आई-वडिलांसह मुलीवर काळाचा घाला

datta jadhav

संशयित प्रियकरास पोलीस कोठडी

Patil_p

नशेत तर्र पजेरो चालकाची विद्युत पोलला धडक

Archana Banage

साताऱयात आदेश उल्लंघन करणाऱयांवर कारवाई

Patil_p

मनोरंजन व्यक्त होण्याचे साधन

Patil_p
error: Content is protected !!