प्रतिनिधी/ बेळगाव
धामणे रोड, वडगाव येथे गांजा विकणाऱ्या दोन तरुणांना शहापूर पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याजवळून पाऊण किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. शनिवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.
धामणे रोड, वडगाव परिसरातील केईबीजवळ गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच शहापूरचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार एच. व त्यांच्या सहकाऱ्यांनी अचानक छापा टाकून दोघा जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याजवळून 750 ग्रॅम गांजा, 350 रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
महम्मद इक्बाल नजीरअहमद कमाल (वय 38) रा. साईनगर, धामणे रोड, शानूर ऊर्फ नवाज ऊर्फ चिनी मगदूम दड्डी (वय 25) रा. विष्णू गल्ली, वडगाव अशी अटक करण्यात आलेल्या दोघा जणांची नावे आहेत. अमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यांतर्गत त्यांच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे.