तरुण भारत

हेब्बाळजवळ अपघातात दोन युवक ठार

खानापूर : नंदगड येथून गणेबैल गावाला जात असताना हेब्बाळजवळील वळणावर दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने शुक्रवारी सायंकाळी अपघात घडून दोन युवक ठार झाले. दुचाकीने रस्त्याच्या बाजूच्या झाडाला जाऊन धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेही गंभीर जखमी झाले. या अपघातात गणेश विठ्ठल गुरव (वय 21) राहणार नंदगड व सुरेश नागाप्पा तोपिनकट्टीकर (वय 25) राहणार गणेबैल या युवकांचा मृत्यू झाला. या अपघाताची नोंद नंदगड पोलीस स्थानकात झाली.

 याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरेश तोपिनकट्टीकर व गणेश गुरव हे दोघे मित्र ट्रकवर विटा भरण्याचा व्यवसाय करत होते. सुरेश हा कामानिमित्त नंदगडला जाऊन गणेश याला घेऊन परत येत असताना हेब्बाळजवळ वळणावर त्यांच्या केए 22 एचजी 0835 या दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे रस्त्याच्या शेजारी असलेल्या झाडाला जाऊन जोरदार धडक दिल्याने दोघेही गंभीर जखमी झाले होते. 108 या रुग्णवाहिकेतून त्यांना खानापूर येथे आणण्यात आले. मात्र गंभीर जखमी असल्याने खानापूर दवाखान्यातून त्यांना बेळगाव येथे पाठविण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना दोघांचाही मृत्यू झाला.

Advertisements

 गणेश याचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला तर सुरेश यांचा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. या घटनेची नोंद नंदगड पोलीस स्थानकात झाली आहे.

Related Stories

हुक्केरी गुरुशांतेश्वर मठाकडून रुग्णवाहिका प्रशासनाकडे सुपूद

Amit Kulkarni

जिल्हाधिकाऱयांकडून मतदान केंद्रांची पाहणी

Omkar B

मोदगा येथे गुऱहाळ घरांना प्रारंभ

Patil_p

आर्ष विद्या केंद्रात संक्रांत साजरी

Patil_p

घसरलेल्या टक्केवारीचा लाभ कोणाला?

Amit Kulkarni

कडोली येथे दुकान फोडून 60 हजारांचा ऐवज लंपास

Patil_p
error: Content is protected !!