Tarun Bharat

डेव्हलपरला टायपिंग मिस्टेक पडली भारी

Advertisements

एका घराच्या किमतीत महिलेने खरेदी केली पूर्ण वसाहत

स्वतःसाटी एक सुंदर घर निर्माण करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. काही लोक हे स्वप्न लवकर पूर्ण करतात काही लोक विचारपूर्वक गुंतवणूक करतात. अमेरिकेतील एका महिलेने असेच करत अत्यंत विचारपूर्वकपणे नेवाडामधील एक मालमत्ता स्वतःसाठी निवडली. तिने घरासाठीची कागदपत्रे तयार करविली होती. परंतु तिला एका घराच्या किमतीत परिसरातील 84 घरे मिळाल्याचे तिला माहित नव्हते.

ही घटना जितकी रंजक आहे तितकीच कायदेशीर डावपेच समजाविणारी आहे. एका महिलेने 4 कोटी 70 लाख रुपयांमध्ये नेवाडामध्ये पूर्णच्या पूर्ण कॉलनीच खरेदी केली. महिलेने स्वतःच्या ड्रीम हाउससाठी पैसे जमविल्यावर ती खरेदी करण्यासाठी औपचारिकता चालविली होती. तिच्या कागदपत्रांमध्ये ‘कॉपी अँड पेस्ट’चा प्रकार घडल्याने डेव्हलपर्सची झोपच उडाली.

नेवाडाच्या स्पार्क्समध्ये ही महिला घर खरेदी करणार होती. यासाठी तिने वॉशोई काउंटीसोबत मिळून कागदपत्रे तयार करविली. लास वेगासमधील फर्म वेस्टमिंस्टर टायडलकडून झालेल्या एका टायपिंग मिस्टेकमुळे टोल ब्रदर्सच्या 85 प्रॉपर्टीज महिलेच्या नावावर झाल्या. महिलेला एका घराच्या किमतीत 85 घरांचा ताबा मिळाल्याचे समजल्यावर हाउस डेव्हलपर टोल ब्रदर्सची शुद्धच हरपली.

चुकीची माहिती कळल्यावर त्वरित या मालमत्तांची मालकी हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. परंतु महिलेला याकरता या सर्व मालमत्ता डेव्हलपर्सच्या नावावर कराव्या लागणार होत्या. याप्रकरणी महिलेने समजुतदारपणा दाखवत या मालमत्ता परत केल्या आहेत.

Related Stories

ग्रेटा ‘टूलकिट’ प्रकरणी पर्यावरणवादी दिशाला अटक

Abhijeet Shinde

तृणमूल नेते अनुव्रत मंडल यांना सीबीआयकडून अटक

Amit Kulkarni

आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांच्या मृत्यूची नोंदच नाही; त्यामुळे मदतीचा प्रश्नच उद्भवत नाही

datta jadhav

कोरोना : चीनमधील 250 भारतीयांना परत आणणार

prashant_c

कोरोनामुक्तांचा आकडा वाढतोय!

Patil_p

बाबरी मशीद विध्वंस प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता

datta jadhav
error: Content is protected !!