Tarun Bharat

गुजरात जायंट्सकडून यु मुम्बा पराभूत

वृत्तसंस्था/ हैदराबाद

नवव्या प्रो कबड्डी लीग स्पर्धेतील येथे रविवारी झालेल्या सामन्यात प्रतीक दाहियाच्या शानदार कामगिरीच्या जोरावर गुजरात जायंट्ने यु मुम्बाचा 38-36 अशा 2 गुणांच्या फरकाने पराभव केला.

या सामन्यात दाहियाने 13 गुण नोंदवित सामनावीराचा बहुमान मिळविला. दाहियाला प्रणय राणेकडून चांगली साथ मिळाली. सामन्यातील पाचव्या मिनिटाला यु मुम्बाने गुजरातवर 6-3 अशी आघाडी घेतली होती. त्यानंतर मोहित आणि संदीप यांच्या शानदार चढायांच्या जोरावर यु मुम्बाने गुजरात जायंट्सचे सर्व गडी बाद करून 10-4 अशी बढत मिळविली. आठव्या मिनिटापर्यंत यु मुम्बाने आपले वर्चस्व राखताना 15-4 अशी आघाडी गुजरातवर घेतली होती. गुजरातच्या रिंकू नरवाल आणि संदीप यांच्या चढायांवर यु मुम्बाची आघाडी थोडी कमी झाली. मध्यंतरापर्यंत यु मुम्बाने गुजरात जायंट्सवर 20-13 अशी बढत मिळविली होती. पण सामन्याच्या उत्तरार्धात दाहियाच्या सुपर रेडवर गुजरातने यु मुम्बाचा 2 गुणांच्या फरकाने पराभव केला.

Related Stories

पद्मश्री सन्मानित लिंबा राम यांच्या नशिबी हलाखीचे जगणे!

Patil_p

भारताच्या पुरुष संघाला पहिले सुवर्ण

Patil_p

मास्टर ब्लास्टर सचिनकडून खास फोटो शेअर करत महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा !

Tousif Mujawar

कुसल परेराला कोरोनाची बाधा

Patil_p

कसोटी मानांकनात रोहित शर्मा आठव्या स्थानी

Patil_p

दक्षिण आफ्रिका संघाला दंड

Patil_p