Tarun Bharat

UAE कडून मंगळ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण

ऑनलाईन टीम / अबू धाबी : 

संयुक्त अरब अमिरातीने ‘होप मार्स मिशन’ या मंगळ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण केले. युएईने जपानमधील तानेगाशिमा येथील लाँच पॅडवरुन आज सकाळी 6 वाजून 58 मिनिटांनी हे प्रक्षेपण केले. 

हवामान अभ्यासासाठी मंगळावर यान सोडणारा संयुक्त अरब अमिराती हा पहिलाच मुस्लिम देश ठरला आहे. या यानाला मंगळापर्यंत पोहचण्यासाठी सात महिन्यांचा कालावधी लागणार आहे. 1.3 टन वजनाचे हे यान 50 कोटी किमीचे अंतर पार करणार आहे. फेब्रुवारी 2021 मध्ये हे यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल. 

मंगळावरील हवामान, वातावरणातील बदल, मंगळावरील पाण्याचा अंश आणि मातीचाही या उपग्रहामार्फत अभ्यास केला जाणार आहे. आतापर्यंतच्या काळात मंगळाच्या रचनेमध्ये कसा बदल झाला, याचाही अभ्यास हे यान करेल. हे यान म्हणजे उमेद आणि मानवतेचे प्रतिक असल्याचे युएईने म्हटले आहे. 

Related Stories

जर्मन नागरिकांना इशारा

Patil_p

अमेरिकेतील वृद्धांमध्ये कोरोना लसीचे भय

Patil_p

11 कोटी सब्सक्रायबर्स, 400 कोटी कमाई

Patil_p

“दिल्लीत येण्याची माझी इच्छा नव्हती”: गडकरी

Archana Banage

कृषी आंदोलनाला 6 महिने पूर्ण ; शेतकऱ्यांचा आज ‘काळा दिवस’

Tousif Mujawar

खोक्याबरोबर खेळायची आदित्य ठाकरेंना लहानपणापासून सवय-दीपक केसरकर

Archana Banage