ऑनलाईन टीम / अबू धाबी :
संयुक्त अरब अमिरातीमध्ये कोरोना लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणीला सुरूवात झाली आहे. आतापर्यंत तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी गेलेली जगातील ही पहिलीच लस आहे. एका वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
दुबईमधील दी 42 हेल्थकेअर आणि चीनमधील सिनोफार्म या कंपन्यांनी एकत्रितपणे ही लस तयार केली आहे. संयुक्त अरब अमिरातीमध्ये आतापर्यंत 15 हजार जणांना ही लस देण्यात आली आहे. संयुक्त अरब अमिरातीच्या आरोग्य विभागाचे अध्यक्ष शेख अब्दुल्ला बिन मोहम्मद अल हमीद हे या लसीच्या चाचणीत भाग घेणार्या पहिल्या काही व्यक्तींपैकी एक होते.
अबू धाबीमधील शेख खलिफा मेडिकल सिटीमध्ये एका आरोग्य केंद्रात नागरिकांना ही लस देण्यात आली. या लसीच्या पहिल्या आणि दुसऱ्या चाचणीत सकारात्मक रिझल्ट मिळाले. त्यानंतर ही लस तिसऱ्या टप्प्यातील चाचणीपर्यंत पोहचली.