वाढत्या महागाईचे कारण ः 7 टक्के विकासदर घोषित
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधी संघटना अर्थात आयएमएफ यांनी भारताच्या विकास दरासंदर्भात अलीकडेच नव्याने घोषणा करताना संभाव्य विकास दर घटवला होता. या अनुषंगाने आता गुंतवणूक क्षेत्रातील बँक युबीएस यांनीही भारताच्या विकास दरामध्ये घट केली आहे. बँकेने आर्थिक वर्ष 2022-23 साठी नवा जीडीपी दर हा 7 टक्के इतका जाहीर केला आहे. वाढत्या महागाईच्या कारणास्तव युबीएसने हा नवा घटवलेला विकास दर जाहीर केला आहे.
अर्थव्यवस्थेच्या वेगावर प्रभाव
महागाई सध्या वाढत असून ती अशीच राहिल अशी भीतीही युबीएसने व्यक्त केलीय. यामुळे मागणीमध्ये घट होण्याचा अंदाजही बँकेने व्यक्त केला असून अर्थव्यवस्थेचा वेग काहीसा प्रभावीत होण्याची शक्मयता वर्तवली आहे. याआधी युबीएसने भारताचा विकास दर 7.7 टक्के इतका घोषित केला होता.