ऑनलाईन टिम / नवी दिल्ली
रशियाने वेढा घातलेल्या मारियुपोल शहराबाबत युक्रेनने रशियाबरोबर वाटाघाटीची “विशेष फेरी” आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे, असे कीवमधील एका वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने सांगितले.
“आम्ही कोणत्याही अटीशिवाय मारिओपोलमध्ये ‘विशेष वाटाघाटी’ करण्यास तयार आहोत,” असे युक्रेनचे मुख्य वार्ताकार आणि राष्ट्रपतींचे सहायक मायखाइलो पोडोल्याक यांनी आपल्या ट्विटर हँडलवर सांगितले.
आणखी एक प्रमुख युक्रेनियन वार्ताकार, डेव्हिड अरखामिया यांनी टेलिग्रामवर सांगितले की “ते स्वत: आणि पोडोलियाक युक्रेनची लष्करी चौकी आणि नागरिकांच्या स्थलांतरावर रशियन अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी मारियुपोल येथे जाण्यास तयार आहेत.”
मारियुपोलमधून नागरिकांना बाहेर काढण्याचा आणखी एक हताश प्रयत्न बुधवारी अयशस्वी झाल्यामुळे, युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी चेतावणी दिली आहे की, “मारियुपोल शहरात हजारो सैन्य आणि नागरिक अडकून परिस्थिती गंभिर बनत आहे.”
रशियाच्या वेढ्यापासून शहराचे रक्षण करणाऱ्या अझोव्ह रेजिमेंटमधील कमांडर, श्वेतोस्लाव पालामार यांनी टेलिग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, त्यांचे सैन्य दक्षिणेकडील बंदरातून नागरिकांसह बाहेर काढण्यासाठी तयार आहे.” “जखमींना बाहेर काढणे, मृतांचे मृतदेह बाहेर काढणे आणि रशियाच्या नियंत्रणाखाली नसलेल्या प्रदेशात त्यांना सन्मानाने दफन करणे हा आमचा मुख्य हेतू आहे.” त्याच वेळी सांगताना पालामार म्हणाले की त्यांचे युनिट रशियाच्या शस्त्रांसह पूर्णपणे आत्मसमर्पण करण्याच्या मागणीकडे ते पुर्णपणे दुर्लक्ष करणार आहे. या प्रस्तावावर मॉस्कोकडून त्वरित प्रतिक्रिया आली नाही.