मुंबई ः
युको बँकेचा समभाग शुक्रवारी शेअरबाजारामध्ये 8 टक्के इतका तेजी नोंदविताना दिसला. सदरचा समभाग शुक्रवारी बीएसईवर वरीलप्रमाणे वाढत 28 रुपयांवर व्यवहार करत होता. याआधीच्या सत्रामध्ये युको बँकेचा समभाग 25 रुपयांवर बंद झाला होता. सुमारे 41 लाख समभागांमध्ये व्यवहार झाल्याची माहिती शेअरबाजाराकडून देण्यात आली आहे. युको बँकेने तिसऱया तिमाहीमध्ये 110 टक्के वाढीसह 652 कोटींचा निव्वळ नफा कमावला आहे.