Tarun Bharat

राज्यपालांना हटवण्यासाठी उदयनराजेंनी दिल्लीत आंदोलनाला बसावे

आमदार शिवेंद्रराजेंनी मांडली भूमिका

प्रतिनिधी/ सातारा

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराजांच्याबाबत प्रत्येकाने आदर राखला पाहिजे. महापुरुषांचा एकेरी उल्लेख थांबवला पाहिजे. प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱयांनी जबाबदारी घेतली पाहिजे. लोकांच्या भावना जपल्या पाहिजेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना छत्रपतींचा आदर आहे. देवेंद्र फडणवीस आमचे नेते राज्यपालांना समज देतील. ते लोकांच्या भावना समजून घेणार आहेत. लवकरच निर्णय घेतील, गव्हरनर बदलाचे अधिकार राज्याचे नाहीत केंद्राचे आहेत. माझे म्हणणे हे आहे की खासदार उदयनराजेंनी आंदोलनासाठी दिल्लीत बसावे. हालचाली दिल्लीतून कराव्यात. नुसता दंगा करण्यात काय अर्थ नाही, अशी भूमिका आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मांडली.

  सोमवारी सकाळी सातारा पालिकेत आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह नगरविकास आघाडीचे अशोक मोने, अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, शेखर मोरे-पाटील, धनंजय जांभळे, विजय काटवटे, भालचंद्र निकम, फिरोज पठाण, शकील बागवान, बाळासाहेब महामुलकर, महेश जगताप, सचिन सारस, रवी माने, रवी पवार, चेतन सोळंकी, राजू गोरे, दीपलक्ष्मी नाईक, वनिता कण्हेरकर यांच्यासह मोठया संख्येने कार्यकर्ते पालिकेत जमले. त्यांनी मुख्याधिकारी अभिजित बापट यांच्या केबीनमध्ये जावून त्यांना अवाजवी करावाढी संदर्भात निवेदन देण्यात आले. पालिकेतून बाहेर पडल्यावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पत्रकाराशी संवाद सांधला. 

  आमदार शिवेंद्रराजे पुढे म्हणाले, राज्यपालाचा निर्णय येथे होवू शकतो काय, इथे कलेक्टरची, प्रांताची बदली होवू शकते. सीओची होवू शकते, एसपीची होवू शकते. गव्हरनर बदलायचे तर तुम्हाला दिल्लीत जावून आंदोलनाला बसले पाहिजे.  त्यामुळे खासदार उदयनराजेंना दिल्लीत जावून बसून राज्यपालांची बदली करुन घ्या, असा त्यांनी सल्ला दिला. त्यांच्या आंदोलनामागे राजकीय स्वार्थ आहे काय माहिती नाही. त्यांनी नेमकी कोणती दिशा धरली आहे त्यांचे त्यांनाच माहिती. आम्ही जिथं आहे तिथे प्रामाणिक आहे. स्वतःचा राजकीय स्वार्थ असू शकतो. ज्या नेतृत्वासोबत आम्ही काम करतो त्यावर ठाम राहिले पाहिजे. माझ काम नाही झाले म्हणून प्रेशर टॅक्टीज व मला माहिती नाही. त्यांच त्यांना माहिती असावे, असेही आमदार शिवेंद्रराजे यांनी सांगितले.

Related Stories

राज्यातील सहाही विधानपरिषद जागा भाजप जिंकणार

Abhijeet Khandekar

रॅट चाचणीत त्रुटी आढळल्याने 2 लॅब बंद

datta jadhav

जिल्हय़ात 21 खासगी हॉस्पिटलमध्ये मिळणार लस

Patil_p

सांगली : पारे येथे जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या 22 लोकांवर गुन्हा

Archana Banage

जंबो कोविड सेंटरमधील प्रवेश पारदर्शी होणार

datta jadhav

पोस्टाच्या आधारलिंकला सातारा जिल्हा ठरला देशात अव्वल

Amit Kulkarni