Udayanraje: उदयनराजे यांनी दिपक केसरकरांची पुण्यातील विश्रामगृहात आज भेट घेतली. विकासकामासंदर्भात बैठकित चर्चा करण्यात आल्य़ाचे त्यांनी सांगितले. राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा.तसेच महाबळेश्वरातील पर्यटनाच्या विकासाबाबत केसरकरांशी भेट घेतल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.यावेळी त्य़ांना महाविकास आघाडीवर टीका केली तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले. उदयनराजे आणि केसकरांच्या भेटीनंतर दीपक केसरकर पर्यटन खात्याचे मंत्री होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले, सत्ता स्थापन करण्यासाठी स्वार्थासाठी एकत्र येतात त्यांना एकत्र ठेवण्यासाठी खूप मोठे कष्ठ घ्यावे लागतात.परंतु जर एका विचाराने एकत्र येतात त्यांना कोणतीच वेगळी ताकद वापरावी लागत नाही. त्यामुळे शिंदे गट कायमस्वरूपी एकत्र राहणार असे दिसतंय. लोकांनी ते आता स्विकारलं आहे. काही गोष्टी वेळ आल्यावरच समोर येतील. प्रत्येकाला वाटतं सत्तेत राहावं. पण सत्ता का गेली याचं आत्मचिंतण करण गरजेचं आहे. शिवसेना माझी आहे असं म्हणायचं का? उदयनराजे यांनी ठाकरे गटाला प्रश्न विचारला.
पुढे बोलताना ते म्हणाले, साताऱ्याने महाराष्ट्राला दिशा देण्याचे काम केले आहे. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी प्रयत्न केले.त्यामुळे त्यांच्यासंदर्भात जातीयवाद व्हायला नको असं त्यांनी म्हटलयं. मुख्यमंत्री असताना फडणवीसांनी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.


previous post