उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा वाढदिवस आज मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रभर साजरा केला जात आहे. महाराष्ट्रातून शिवसैनिक मातोश्रीवर पोहचले आहेत. तर ठिकठिकाणी रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. आज काही शिवसैनिकांनी (Shivsena) रस्त्यावर चित्र रेखाटलं आहे. तर काहींनी शपथपत्र दिले आहे. कोल्हापुरात (Kolhapur) देखील भव्य अशी निष्ठा रॅली दसरा चौक ते शिवाजी महाराज चौकापर्यंत काढण्यात आली. या बाईक रॅलीतून बंडखोरांना कट्टर शिवसैनिकांनी उत्तर दिले आहे.
महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापुरात शिवसैनिकांनी निष्ठा रॅली काढली आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात कोल्हापुरातील दोन आमदार, खासदार गेले आहेत. यामध्ये सेनेचे माजी खासदार राजेश क्षीरसागर गेल्याने कोल्हापुरात वातावरण तापलं आहे. सेनेला पाठिंबा देण्यासाठी शिवसैनिक प्रयत्न करत आहेत.
हेही वाचा- मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण
गद्दारांना धडा शिकवणारचं असं आज शहरप्रमुख सुनील मोदी यांनी म्हटलंय. तर तुमच्या दोन्ही मुलांना उत्तर, दक्षिणचं पद देतो, आमच्या दोघांची घर नावानं करुन देतो. पण, क्षीरसागरांनी टीका करणं सोडावं अस रविकिरण इंगवले यांनी म्हटलं आहे. दरम्यान आज वाढदिवसाच्य़ा निमित्ताने या रॅलीच्या माध्यमातून उध्दव ठाकरे यांच्या पाठीशी आम्ही आहोत असा संदेश शिवसैनिकांनी दिला आहे. शिवाजी महाराज चौकात केक कापून रॅलीची सांगता होणार आहे.


previous post
next post