शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. बंडखोरांचे नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. मात्र यात पक्षप्रमुख असा उल्लेख नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्य़ा आहेत. सध्या शिवसेना कोणाची, धनुष्यबाण कोणाचा यावरून कोर्टात वाद गेला आहे. त्यातच शुभेच्छा देताना शिंदेनी जाणीवपूर्वक उल्लेख टाळला की अनावधनाने राहिला याची जोरदार चर्चा सुरु आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री माननीय श्री.उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना निरोगी दीर्घायुष्य लाभो हीच आई जगदंबेच्या चरणी प्रार्थना…अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या आहेत. मात्र यामध्ये पक्षप्रमुख म्हणून त्यांनी उल्लेख केलेला नाही. अनुल्लेख अनावधानानं की ठरवून केला आहे असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील शुभेच्छा देताना पक्षप्रमुख असा उल्लेख नाही. दोघांनीही वाढदिवसाचे अभिष्ठचिंतन केलं आहे. माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांना वाढदिवसाच्या अनेकानेक शुभेच्छा! मी त्यांना निरोगी जीवन आणि दीर्घायुष्य चिंतितो! असे ट्विट त्यांनी केले.


next post