Tarun Bharat

पीक कर्जावर व्याज परतावा पुन्हा सुरु करा; मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

मुंबई: केंद्राने पीक कर्जावर व्याज परतावा पुन्हा सुरू करावा अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. परतावा परत न मिळाल्याने जिल्हा सहकारी बँका आणि शेतकऱ्यांना (Farmer) मोठी अडचण निर्माण झाली आहे .असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. कृषी क्षेत्रासाठी आणि शेतकऱ्यांसाठी त्यांनी मागणी करत पत्र लिहले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राकडे मागणी करत केंद्रीय कृषिमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. यात त्यांनी जिल्हा सहकारी बँका आणि शेतकर्‍यांना दिलासा द्यावा असे म्हटले आहे. . व्याज परतावा बंद झाल्याने राज्यातील 70 लाख शेतकऱ्यांना याचा फटका बसू शकतो. त्यामुळे केंद्राने पीक कर्जावरील व्याज परतावा देणं परत सुरु करावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांनी केली आहे.

२०२२-२३ पासून केंद्र सरकारकडून शेतकर्‍यांना देण्यात येणार्‍या पीक कर्जावरील दोन टक्के व्याज परतावा अनुदान बंद करण्यात आले आहे. त्यामुळे याचा फटका जिल्हा बँकांसह शेतकर्‍यांना बसणार आहे.जिल्हा बँकांकडून वेळेवर पीक कर्जाची परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांसाठी तीन लाखापुढील व पाच लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्के दराने देण्याच्या योजनेवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Related Stories

दिल्ली कॅपिटल्स-आरसीबी आज आमनेसामने

Patil_p

हिमस्खलनात अडकले लष्कराचे 7 जवान; बचावकार्याला वेग

datta jadhav

शिंदे सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल ५ तर डिझेल ३ रुपयांनी स्वस्त

Abhijeet Khandekar

अश्लील डान्सच्या आयोजनाला राष्ट्रवादीकडून बंदी- अजित पवार

Archana Banage

केंद्र सरकारने चूक सुधारावी; धनगर आरक्षणप्रश्नी खासदार धैर्यशील माने यांची महत्त्वाची मागणी

Archana Banage

“थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात भाजपचं सरकार येणार”

Archana Banage
error: Content is protected !!