Tarun Bharat

काळजी करू नका, शिवसेना तुमच्यासोबत…

Advertisements

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

खासदार संजय राऊत यांच्या अटकेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राऊत यांच्या भांडूपमधील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. त्यावेळी राऊत यांच्या कुटुंबियांना धीर देण्याचा प्रयत्न ठाकरे यांनी केला. तसेच काळजी करु नका, शिवसेना तुमच्यासोबत आहे, असे आश्वासन त्यांनी दिले.

उद्धव ठाकरे आज दुपारी भांडुपमधील राऊत यांच्या निवासस्थानी दाखल झाले होते. त्यावेळी राऊत यांच्या मातोश्रींच्या तब्बेतीची विचारपूस करत त्यांना आधार देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उद्धव ठाकरेंची भेट ही अवघ्या 10 मिनिटांची होती. ही वैयक्तिक आणि कौटुंबिक भेट असल्याचं सांगण्यात आलं होतं. भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरे मातोश्रीकडे रवाना झाले आहेत. दरम्यान, थोडय़ाच वेळात मातोश्रीवरुन राऊत यांच्यावरील कारवाईवर ते आपली भूमिका मांडणार आहेत.

हेही वाचा : GST संकलनात 28 टक्क्यांची वाढ; जुलैमध्ये तिजोरीत 1.49 लाख कोटी

Related Stories

शरद पवार मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल

Rohan_P

उपलब्ध बाजारपेठेनुसार पिके घेऊन शेतीला चांगला दर्जा मिळवून देऊया : शरद पवार

Rohan_P

महाराष्ट्रात 2,515 नवे कोरोना रुग्ण, 35 मृत्यू

Rohan_P

सांगलीत राष्ट्रवादीचे जिल्हा शहर उपाध्यक्ष पाटोळे यांचा खून

Abhijeet Shinde

सातारा जिल्ह्यात 44 नागरिकांना दिला डिस्चार्ज, 306 नमुने पाठविले तपासणीला

Abhijeet Shinde

पंतप्रधानांच्या समोरच अजित पवारांनी राज्यपालांना फटकारले

Abhijeet Shinde
error: Content is protected !!