ऑनलाईन टींम/तरुण भारत
सुप्रीम कोर्टाकडून आज सत्ताधाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे पुढील सुनावणी आता लांबणीवर जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सुनावणीत पुढे काय निकाल लागणार याकडे आता राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. दरम्यान एकनाथ शिंदे सेनेच्या पक्षाच्या चिन्हाबाबत मागणी करु शकतात. म्हणूनच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. बाजू एेकल्याशिवाय ‘धनुष्यबाणा’ बाबत कोणताही निर्णय घेऊ नये अशी मागणी त्यांनी केली आहे.
एकनाथ शिंदे यांनी सेनेतील १४ खासदार आमच्या सोबत असल्याचा दावा केला आहे. राष्ट्रपती निवडणूकीत कोणाला पाठिंबा द्याचया या संदर्भातलउध्दव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर बैठक बोलावली होती. शिवसेनेनं पाठिंबा दिल्यास द्रौपदी मुर्मू मातोश्रीवर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेचे शिवसेनेच्या खासदारांचं शिष्टमंडळ मुर्मू यांना भेटणार असल्याची माहिती समोर आली आहे. १४ जुलैला त्या प्रचारासाठी मुंबईत येणार आहेत.
हेही वाचा- सातारा आणि कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात पाच दिवस अतिमुसळधार पाऊस
दरम्यान माजी मंत्री नेवाशाचे आमदारा शंकरराव गडाख यांनी उध्दव ठाकरे यांना साथ देणार असल्याचे म्हटलं आहे. सोनईमधील मेळाव्यात त्यांनी ही घोषणा केली आहे.