Tarun Bharat

आईचं दुध विकणारा शिवसेनेत नको; CM ठाकरेंनी सांगितली बाळासाहेबांची ‘ती’ आठवण!

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिवसेनेचा आज ५६ वा वर्धापन दिन (Today is the 56th anniversary of Shiv Sena) साजरा होत आहे. विधान परिषदेच्या (MLC Election) निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा वर्धापन दिन हॉटेल वेस्ट इन येथे होत आहे. या वर्धापन दिनाच्यानिमित्त शिवसेनेचे सर्व नेतेमंडळी या हॉटेलमध्ये उपस्थित आहेत. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेही उपस्थित असून, त्यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना संबोधित केले. आज भाड्यावर सैनिक घेत आहात. उद्या भाडोत्री राज्यकर्ते आणणार का? भाडोत्री सरकार आणणार का? मुख्यमंत्री पाहिजे, पंतप्रधान पाहिजे असे टेंडर काढणार का? नाहीतरी दर पाच वर्षांनी नागरिकांना मते मागाला जावचं लागते, असा टोलाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी भाजपला लगावला आहे.

आईचं दूध विकणारा नको
दरम्यान, यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी पक्षाची फसवणूक करून दुसऱ्या पक्षाला मदत करणाऱ्यांविषयी बाळासाहेब ठाकरे काय म्हणाले होते, याची आठवण सांगितली. “आपण फाटाफुटीचं राजकारण भोगत आलो आहोत. पण कितीही फाटलं, तरी शिवसेना अजून मजबुतीनं उभी राहिली आहे, हे इतिहासाला आपण दाखवलं आहे. अशीच फाटाफूट मागे झाली, तेव्हा शिवसेना प्रमुख म्हणाले होते मला आईचं दूध विकणारा नराधम शिवसेनेत नको”, अशी आठवण देखील त्यांनी सांगितली.

माझा पक्ष पितृपक्षच
आपल्याकडे पितृपक्षाबद्दल अनेक गैरसमज आहेत, माझा पक्ष पितृपक्षच आहे. कारण माझ्या पित्यानंच हा पक्ष स्थापन केला आहे. शिवसेना पक्षप्रमुखपदाची सूत्र हाती घेतली, तेव्हा शिवसेना स्थापनेचा क्षण माझ्या डोळ्यांसमोरून तरळून गेला. तेव्हा वन बीएचकेमध्ये माझे आजोबा, मासाहेब, त्यांची ३ मुलं, काका, त्यांचं कुटुंब हे सगळे होते. आज त्या क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार मी आणि आमच्या कुटुंबातले काही सोडले तर अजून कुणी नाहीत. माझं वय तेव्हा जेमतेम ६ वर्षांचं होतं. शिवाजी महाराज की जय म्हणून नारळ फोडला त्याचे पाणी माझ्या अंगावर. फार मोठी जबाबदारी किती मोठी असेल हे तेव्हा काहीच कळले नाही. तुमच्या साथीने आपण अजून पुढे जाऊ. काही आहेत काही निघून गेलेत त्या सर्वांना अभिवादन. त्या पिढीचे देसाई रावते पहिल्या पिढीचे. शिवसेनेचा पहिला महापौर १९७१ साली हेच खूप होत. आज तर मुख्यमंत्री आपले आहेत. तुमची जबाबदारी माझी. दोघांनीही रुसवे अग्निपथ योजनेवरून फुगवे न करता ऐकले. दोघांत आजही शिवसैनिक जिवंत आहे. त्यांना जी जबाबदारी दिली ती यशस्वी करुन दाखवली. मार्मिक छापायला तयार नसतांना दिवाकर रावतेंनी ते शक्य केले, असे ठाकरे म्हणाले.

“उद्या भाडोत्री सरकारही आणणार का?”
अग्निपथ योजनेवरून सुरु असणाऱ्या गोंधळावर बोलताना ठाकरे म्हणाले, मागील काही दिवसांपासून अग्निपथ योजनेवरून केंद्र सरकारवर हल्ला केला जात आहे. या योजनेच्या विरोधात निर्दशने केली जात आहे. योजनेविरुद्ध टीका करण्यात मुख्यमंत्रीही मागे राहिलेले नाही. सैनिकांना चार वर्षांसाठी भाडेतत्वावर घेत आहात. उद्या चालून भाडोत्री सरकारही आणणार का, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी केंद्र सरकारवर (Central government) लगावला.

केंद्र सरकारने (Central government) देशातील नागरिकांना दरवर्षी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, ते आश्वासन सरकारने पाळले नाही. आता अग्निपथ योजनेची घोषणा करून युवकांशी खेळले जात आहे. फक्त नावच मोठे दिले आहे. काम मात्र सुतार काम व वाहन चालकाचे करावे लागणार आहे. कोणत्या योजनेला कोणते नाव देताहेत याचाही विचार करीत नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Related Stories

माझ्या १०० वर्षीय आईनेही लस घेतलीय ; पंतप्रधानांनी लसीकरणाला घाबरणाऱ्यांची केली भीती दूर

Archana Banage

विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांना तात्काळ मदत द्या ; प्रविण दरेकरांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Archana Banage

देशात ओमिक्रॉनचे 174 रुग्ण

datta jadhav

जिल्ह्यात २६ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची भर

Archana Banage

शोपियां चकमकीत दहशतवाद्याला कंठस्नान

datta jadhav

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.40 कोटींवर

datta jadhav