Tarun Bharat

धनुष्यबाण आमचाच! उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला सुनावलं

Advertisements

ऑनलाईन टीम/तरुण भारत

शिंदेगट शिवसेनेनला आणखीन एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. शिवसेनेच्या (Shivsena) अधिकृत धनुष्यबाण या चिन्हावर आपला दावा करत आहेत. यावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं आहे. माझ्या शिवसैनिकांना सांगितलं, कायद्यानुसार धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरवून घेऊ शकत नाही. नवीन चिन्हाचा विचार करण्याची गरज नाही. चिन्हा बाबत कायदे तज्ज्ञांशी चर्चा केली आहे. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह सेनेकडे राहणार आहे. त्यामुळे ती चिंता सोडा, अस उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

आषाढी एकादशीनंतर पंढरपूरला जाणार आहे. पंढरपूरला या आहे असा वारकऱ्यांचा निरोप मला आला आहे. मात्र गदारोळ संपल्यानंतरच मी पंढरपूरला जाणार आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून रोज मातोश्रीवर शिवसैनिक येत आहेत. मी रोज त्यांच्याशी बोलतो. मात्र त्यांच्यावर दडपण वाढेल असे मी काहीच बोलणार नाही.

हेही वाचा : जपान हादरलं ! माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, सध्या एका चर्चा सुरु आहे शिवसेनाच्या चिन्हा बद्दल, माझ्या शिवसैनिकांना सांगितलं कायद्याच्या दृष्टीने बघितलं तर, घटनेमध्ये नमूद केलं आहे. धनुष्यबाण शिवसेनेपासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, त्यामुळे ती चिंता सोडा. पण चिन्ह म्हटल्यानंतर मतदान पत्रिकेवरील चिन्ह ते महत्वाचे आहे ते आपलं धनुष्यबाण आहे ते आपलं कोणी हिरावून घेऊ शकत नाही.

दरम्यान, लोकं नुसत धनुष्यबाणावरती विचार नाही करत तर धनुष्यबाण हाती घेतलेल्या माणसाची देखील चिन्ह बघतात, की अरे याची चिन्हा काय बरोबर नाहीत, याची लक्षणं काय बरोबर नाही. हा शिवसेनेचा उमेदवार आहे, तरी लोकं विचार करुनचं आपल मतदान करत असतात. त्यानंतर मागच्या काळामध्ये जे काय काय झालं होतं सांगितलं होतं. अशा शब्दात त्यांनी बंडखोर आमदारांवर देखील टीका केली आहे.

हेही वाचा : हिंदूहृदयसम्राट…भाजपच्या पोस्टरवर; बाळासाहेब ठाकरे यांच्या छबीचा चतुराईने वापर

Related Stories

कबनूरात आणखी दोन बाधित

Abhijeet Shinde

दुचाकी अपघातात बालिका ठार

Patil_p

महावितरणचे कर्मचारी फिल्डवर, लॉकडाऊनमध्ये अखंड वीज देण्यासाठी महावितरणची धडपड

Abhijeet Shinde

दानेवाडीतील शेततळ्यात पडून बालकाचा मृत्यू

Abhijeet Shinde

किश्तवाडमध्ये चकमकीत 2 दहशतवादी ठार

Patil_p

कोल्हापूर एमआयडीसी १६ मे पासून आठ दिवस राहणार बंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!