शिवसेना आणि हिंदुत्व एकमेकांमध्ये गुंफली आहे. हिंदुत्व हा शिवसेनेचा श्वास आहे. बाळासाहेबांचेच विचार मी पुढे घेऊन जात आहे. काल हिंदू,आज हिंदू आणि उद्याही हिंदूच राहणार आहे. मधल्या काळात जे मिळालं ते बाळासाहेबांनंतरच्या शिवसेननं दिलं. शिंदेसोबत गेलेल्या आमदारांवर पाळत ठेवण्यात आली होती. लघूशंकेला गेलेल्य़ा आमदारांवर पाळत ठेवता ही कसली लोकशाही असा सवाल त्यांनी केला.
शिवसेना बदलली असे काहीजण म्हणतात. शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराने चालते. शरद पवारांच्या आग्रहाखातर मुख्यमंत्री पद स्वीकारलं. माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री म्हणून नको आहे. तर करायचे काय? मी त्यांना आपले मानतो, ते मानतात की नाही हे माहित नाही. ज्यांना मी नको आहे त्यांनी समोर येऊन सांगाव. बंडखोरांपैकी एकानेही येऊन सांगावे की तुम्ही आम्हाला नको मी राजीनामा देतो. मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवलंय. मी घाबरणारा नाही, मी संघर्ष करणारा व्यक्ती आहे. शिवसेना पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार आहे अशी भावनिक साद उध्दव ठाकरे यांनी शिवसेना आमदारांना घातली आहे. तसेच मी वर्षा बंगला सोडून ‘मातोश्री’वर जाण्यास तयार असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुढे बोलताना ते म्हणाले, लोकशाहीत संख्या अधिक ते जिंकतात. पद येत असतात, पदं जात असतात. कोणताही अनुभव नसताना मला मुख्यमत्री पद मिळालं. प्रत्येकांनी मला सहकार्य केलं आहे. मी इच्छेने करणारा माणूस आहे. जिद्दीने मी काम करतो. पवार साहेब, सोनिया गांधी यांनी माझ्यावर विश्वास टाकला आणि मी जिद्दीने काम केले. काॅंग्रेस, राष्ट्रवादीने मुख्यमंत्री नको म्हणणे हा त्यांचा निर्णय आहे. पण आपल्याच घरातील लोक अस करताहेत याच वाईट वाटतयं. त्यांनी मी मुख्यमंत्रीपदी, शिवसेना पक्षप्रमुखपदी नको आहे हे त्यांनी समोर येऊन सांगावे. यासाठी सुरतला जायाची गरज नाही. बंडखोरांनी समोर येऊन सांगा मी दोन्ही पद सोडतो असे स्पष्ट सांगितले.
…तर मी मुख्यमंत्रीपदासह पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार- उध्दव ठाकरे
Advertisements