Tarun Bharat

उद्धव ठाकरे अस्वस्थ; त्यांनी आत्मपरीक्षण करावे

Advertisements

चिंचवड : नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल पाहिले तर शिवसेनेचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा गट शेवटच्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ते अस्वस्थ आहेत त्यांनी आत्मपरीक्षण करावे, असा सल्ला ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिला. तसेच अस्तित्व दाखविण्यासाठीच ते प्रक्षोभक भाषण करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

चिंचवडमध्ये बोलताना मंत्री महाजन म्हणाले, 40 आमदार आणि 12 खासदार त्यांच्या पक्षातून निघून गेले आहेत. उरलेली शिवसेना देखील त्यांच्या हातातून निसटत चालली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लोक दिसत आहेत. एका महिन्यात निवडणुका घ्या हे शक्य आहे का? उद्धव ठाकरे हे अस्वस्थ आहेत. कालच्या मेळाव्याच्या भाषणात ते भडक बोलत होते. लोकांना अस्तित्व दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न ते करत आहेत. त्यांच्याकडे काहीच राहीले नाही.

अधिक वाचा : …त्यानंतरच वाईन विक्रीबाबत अंतिम निर्णय : शंभूराज देसाई

वेदातांने पत्र देऊन ही महाविकास आघाडी सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली नाही. वायनरीच्या बाबत मिटिंग घेतली, पण वेदांताच्या बाबत मिटिंग घेतली का? कोणाला बोलावले का? त्यामुळे तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही. त्यांना तुम्ही रेड कारपेट टाकले का? असा विविध प्रश्नांची सरबत्तीही त्यांनी केली.

Related Stories

गडकरींकडून चांदणी चौक उड्डाणपूल कामाची हवाई पाहणी

datta jadhav

दुचाकीस्वाराची बॅरिकेटसला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

Abhijeet Shinde

शिवसेनेकडून पक्षादेश जारी, आमदारांना व्हीप लागू

Rahul Gadkar

मेढय़ातन सुरु झाल अन् वाढय़ात संपल

Patil_p

सातारा जिल्ह्याची पुन्हा झोप उडाली, दिवसभरात 22 जण पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

बारावी परीक्षा रद्दवर शिक्कामोर्तब

Abhijeet Shinde
error: Content is protected !!