Tarun Bharat

हिंमत असेल तर मैदानात या, भाजप आणि शिंदे गटाला उध्दव ठाकरेंचा इशारा

वादळ निर्माण करणारे शरद पवार आमच्यासोबत- उध्दव ठाकरे

Uddhav Thackeray News: भुजबळांनी शिवसेना सोडली नसती तर कधीच मुख्यमंत्री झाले असते. नियतीच्या मनात काय असतं त्याची कल्पना नाही.आम्हाला मानसिक धक्के खूप बसलेत. भुजबळांनी जेव्हा सेना सोडली तेव्हा ठाकरे कुटुंबाला पहिला मोठा धक्का बसला होता. आत्ता आम्ही धक्काप्रुफ झालो आहोत. बाळासाहेब असताना तुम्ही मतभेद मिटवले. त्यावेळी मतभेद मिटवले हे छान झालं. काही गोष्टी ठरवून होत नसतात.तरूण मनात जिद्द असावी लागते.75 व्या वर्षीदेखील भुजबळ तरूण आहेत अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिली. आज राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांचा 75 वा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने षण्मुखानंद सभागृहात ‘अमृत महोत्सव’ सोहळा आयोजित करण्यात आला यावेळी ते बोलत होते.यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावरही निशाणा साधला.

यावेळी बोलताना ते म्हणाले, मर्द लोकांच्या हातात मशाल देण्याची गरज आहे. बाळासाहेब असताना तुम्ही सेना सोडली हे चांगलं केलं. त्यावेळी घरी येऊऩ तुम्ही मतभेद मिटवले हे खूप छान झालं. भुजबळांनी सेना सोडली तेव्हा ठाकरे कुटुंबाला पहिला मोठा धक्का बसला होता. काही गोष्टी ठरवून होत नसतात. नियतीच्या मनात काय असत सांगता येत नाही.

भाजपवर निशाणा साधताना ते म्हणाले, प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टात जावं लागतं, हिंमत असेल तर मैदानात या. मी मैदानात उतरलो आहे. ही लढाई आम्ही सोडणार नाही. एका मैदानात या, होऊन जाऊ द्या काय ते. अडीच वर्षापूर्वी नवं समीकरण उद्याला आलं. विचारानं राजकारण करणं गरजेचं आहे. वादळ निर्माण करणारे पवार आमच्यासोबत आहे.असा इशारा भाजप आणि शिंदे गटाला दिला.

Related Stories

… अन्यथा मंदिरांची टाळी तोडू : भाजपचा ठाकरे सरकारला इशारा

Tousif Mujawar

बारामतीत बायोगॅसच्या टाकीत पडून चौघांचा मृत्यू

datta jadhav

कोरोनाप्रतिबंधासाठी दिल्ली सरकारचा 5 टी फॉर्म्युला

Patil_p

देशात 1.64 लाख सक्रिय रुग्ण

datta jadhav

खानापुरात भीषण अपघात दोन ठार

mithun mane

अपयश झाकण्यासाठी मोदी विरुद्ध योगी असा दिखावा : नवाब मलिक

Tousif Mujawar