सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदारांच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादावर संसदेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या संदर्भात शिवसेनेच्या उद्धव गटाच्या प्रवक्त्या आणि राज्यसभा खासदार प्रियांका चतुर्वेदी म्हणाल्या, “कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांकडून येणाऱ्या वक्तव्याबाबत आम्ही गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा केली असून लवकरच हा प्रश्न मार्गी लागेल.”
दरम्यान, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावादाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात महाराष्ट्र पोलीस कायदा 37 लागू करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर एकाच ठिकाणी ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी 9 डिसेंबर ते 23 डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. दुसरीकडे, काल एमव्हीए अर्थात महाविकास आघाडीकडून कर्नाटक सरकारविरोधात निदर्शने करण्यात येणार असल्याचे जाहीर केले मात्र, या निदर्शनास प्रशासन आणि पोलिसांकडून अद्याप कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.
महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात २३ डिसेंबरपर्यंत ५ पेक्षा जास्त लोकांना एकत्र येण्यास बंदी आहे. महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ अन्वये कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी हा आदेश जारी केला आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाच्या संदर्भात काल महाविकास आघाडीने केलेल्या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर हा आदेश जारी करण्यात आला.

