Tarun Bharat

उद्धव ठाकरेंकडे प्रचंड वैचारिक दिवाळखोरी

ऑनलाईन टीम / तरुण भारत :

पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशानं माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हाकालपट्टी करण्यात आली आहे. त्यानंतर शिवतारे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. वैचारिकदृष्टय़ा बाळासाहेब ठाकरेंचा शेवटचा आदेश जे पाळत नसतील त्यांच्याकडे प्रचंड दिवाळखोरी आहे. खरी शिवसेना मला एकनाथ शिंदेंची वाटते, अशा शब्दांत शिवतारे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

शिवतारे म्हणाले, उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांच्या विचारांचा विसर पडला आहे. पण एकनाथ शिंदे बाळासाहेबांच्या हिंदुत्त्वाच्या विचाराने पुढे जात आहेत. त्यामुळं आपणही त्यांना समर्थन द्यावं असं मला वाटलं. शिवसेनेतून एकनाथ शिंदेंचा गट बाहेर पडला त्यानंतर मी माझ्या मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य, तालुका पंचायत सदस्य आणि पदाधिकाऱ्यांच्या दोन बैठका घेतल्या. आपल्याकडं विमानतळ येत नसेल, गुंजवणीचं पाणी येत नसेल, राष्ट्रीय बाजार जर आपल्या मतदारसंघातून जात असेल तर आपला मुख्यमंत्री असल्याचा फायदा काय? म्हणून तुम्ही निर्णय घ्या, असे मी सांगितले होते. महाविकास आघाडी सरकारवर सेनेचे आमदार खुश नव्हते. सेनेला मुख्यमंत्रीपद मिळतंय हे दाखवलं गेलं पण त्यानंतर काय होणार याचा सर्वांनाच अंदाज येत होता.

हेही वाचा : …अन्यथा फिरू देणार नाही; नामांतरावरून खैरेंचा शिंदे सरकारला इशारा

एकनाथ शिंदे हे बाळासाहेबांच्या विचारांनीच पुढे जात आहेत. त्यामुळे मी आणि माझ्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला, असेही शिवतारे म्हणाले.

Related Stories

१०० रुपये वाढवून पाच रुपये कमी करायचे हे कसलं मोठं मन?; संजय राऊतांची टीका

Archana Banage

”देवेंद्र फडणवीस माझ्यावर टीका करतात कारण त्यांना असं वाटतं माझ्यामुळे त्यांची सत्ता गेली”

Archana Banage

शहिदांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 36 लाखांची मदत; बिहार सरकारची घोषणा

datta jadhav

राज्यातील घटनांवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का बोलत नाहीत? : देवेंद्र फडणवीस

Tousif Mujawar

थर्टिफर्स्टपूर्वी मुसळधार!

datta jadhav

कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची पाहणी

Patil_p