पाडव्याच्या खरेदीसाठी बाजारपेठ सज्ज : वाहने-इलेक्ट्रीक वस्तूंबरोबरच दागिन्यांचीही होणार खरेदी
प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे दिवाळी अत्यंत साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली होती. त्यामुळे बाजारपेठेवरही मोठे संकट कोसळले होते. आता दोन वर्षांनंतर निर्बंध हटविण्यात आल्याने यंदाची दिवाळी मोठय़ा उत्साहात साजरी करण्यात येत आहे. त्यानिमित्त बाजारपेठ सज्ज झाली असून पाडव्याला मोठी खरेदी करण्यावर भर देण्यात येणार आहे. सोने, इलेक्ट्रीक वस्तु व इतर सर्व व्यापारीवर्गाने पाडक्यासाठी आपली दुकाने सज्ज ठेवली आहेत.
दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने होणाऱया खरेदीसाठी बेळगावची बाजारपेठ सज्ज झाली आहे. खरेदीसाठी येणाऱया नागरिकांना आवश्यक त्या वस्तू मिळाल्या नाहीत म्हणून माघारी फिरावे लागू नये म्हणून व्यापारी सर्व काही तयारी करून सज्ज झाले आहेत. वाहन बाजारपेठ, पेहराव, सराफी पेढय़ा व इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या बाजारपेठेत येणाऱया ग्राहकांचा विचार करून आवश्यक त्या वस्तू मोठय़ा संख्येने उपलब्ध करण्यात आल्या आहेत. बेळगाव बाजारपेठेचा आढावा घेता, वर्षभरातील एकमेव मोठी खरेदीची पर्वणी कॅश करण्यासाठी व्यापारीवर्ग सज्ज झाला आहे.
सोमवारी लक्ष्मी पूजन व नरक चतुर्दशी साजरी झाल्यानंतर वेध लागतात ते पाडव्याच्या खरेदीचे. दिवाळीचा पाडवा बेळगावकरांसाठी खरेदीची एक पर्वणी म्हणूनच ओळखला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱया पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू व वाहन खरेदीसाठी नागरिक या दिवशी बाजारपेठेत प्रचंड गर्दी करतात. दरवर्षीच पाडवा सणाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र खरेदीची मोठी लगबग दिसून येते. खरेदीचा मुहूर्त साधताना कोटय़वधीची उलाढालही होते. यामुळे पाडवा व्यापारीवर्गासाठी महत्त्वाचा मानला जातो. यंदाही यापेक्षा वेगळी परिस्थिती असणार नाही. यामुळेच व्यापाऱयांनी ग्राहकांच्या सोयीसाठीची सर्व सज्जता केल्याचे दिसून आले.
दरवर्षीच्या अनुभवानुसार सोने व चांदीचे दागिने खरेदी करण्यासाठी सराफी पेढय़ांमध्ये गर्दी होणार आहे. या संदर्भात शहरातील प्रमुख सराफी पेढय़ांचा आढावा घेतला असता सराफांनी वेगवेगळ्या डिझाईन्सच्या माध्यमातून आणि गरिबापासून श्रीमंतांपर्यंत सर्व ग्राहकांची सोय होईल, याची काळजी घेतल्याचे दिसून आले. काही जण गुंतवणूक म्हणून, काही हौसेखातर तर बरेच जण खिसा पाहून दागिने खरेदी करतात. बऱयाच जणांचा मुहूर्त साधण्याचा मनोदय असतो. या नुसार कोणाचीही गैरसोय होऊ नये याची काळजी सराफी पेढय़ांमध्ये घेतली जाणार आहे.
काही दिवसांपासून वाहनांच्या बुकींगसाठी असंख्य ग्राहक आल्याची माहिती दुचाकी व चार चाकी शोरुम्समधून उपलब्ध झाली. नागरिक मुहूर्तावर येऊन वाहन घेऊन जाणार आहेत. खरेदीची प्रक्रिया आधीच पार पाडण्यात आली आहे, असे अनेक वाहन वितरकांनी सांगितले. बऱयाचदा ऐनवेळी येणाऱया ग्राहकांना हवी ती वाहने उपलब्ध न झाल्याने नाराज होऊन परतावे लागते, यासाठी अनेकांनी ही दक्षता घेतली आहे. दरम्यान, ऐनवेळी येणाऱयांनाही नाराज व्हावे लागू नये यासाठी वितरकांनी आवश्यक साठा उपलब्ध केला आहे. पाडव्याला वाहनांची खरेदी हमखास होतेच. कामगारांना पगार व बोनस मिळालेला असतो. ठिकठिकाणी दिवाळीच्या खुशालीच्या माध्यमातून पैसे उपलब्ध होतात. यातून स्वतःच्या वाहनाचे स्वप्न पूर्ण करण्याचा मनोदय असतो. यामुळे पाडव्याला वाहन खरेदीसाठी प्रचंड ग्राहकसंख्या असते. याची नोंद सर्व कंपन्यांच्या वितरकांनी घेतल्याचे जाणवत आहे. दुचाकी आणि चार चाकी वाहनांच्या खरेदीसाठीही बरेच ग्राहक बेळगावलाच प्राधान्य देतात. आजुबाजुचे तालुके तसेच परगावांतून येणाऱया नागरिकांमध्ये वाहन खरेदीसाठी बेळगाव येथे गर्दी केली जाते.
इलेक्ट्रॉनिक क्षेत्रात एलईडी टीव्ही आणि फ्रीजची खरेदी मोठय़ा प्रमाणात होते. या बरोबरच वॉशिंग मशीन, मोबाईल आदी वस्तू खरेदीलाही ग्राहकवर्गाने पसंती दिली आहे. मोबाईल, लॅपटॉप, संगणक तसेच इतर हायटेक वस्तू खरेदीकडे सध्या ग्राहकांचा ओढा अधिक आहे. बदलत्या काळाला अनुसरून लागणाऱया वस्तू सण-समारंभाला खरेदी करण्याची पद्धत बेळगावकर जपत आले आहेत. यामुळे पाडव्याचा दिवस बेळगाव बाजारपेठच्या दृष्टिकोनातून समृद्धीचा जाणार, अशीच चिन्हे आहेत.