Tarun Bharat

उडुपीचे पोलीस पथक बेळगावात

Advertisements

कंत्राटदाराच्या आत्महत्येची चौकशी

प्रतिनिधी/ बेळगाव

कंत्राटदार संतोष पाटील (वय 35) आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीसाठी उडुपी पोलिसांचे एक पथक शनिवारी बेळगावात आले होते. या प्रकरणावरून सत्ताधारी भाजप व प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसमध्ये राजकीय धुळवड रंगली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी चौकशी तीव्र केली आहे.

मलपे, जि. उडुपी पोलीस स्थानकाचे निरीक्षक शरणगौडा यांच्या नेतृत्वाखालील पथकातील अधिकारी शनिवारी बेळगावात दाखल झाले होते. हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार शिन्नूर व त्यांच्या सहकाऱयांनीही उडुपी पोलिसांना चौकशीसाठी मदत केली.

माजी मंत्री के. एस. ईश्वराप्पा यांच्या नावे चिठ्ठी लिहून आत्महत्या करणारे कंत्राटदार संतोष पाटील हे मूळचे बडस के. एच., (ता. बेळगाव) या गावचे असून सध्या हिंडलगा परिसरात आपल्या कुटुंबीयांसमवेत त्यांचे वास्तव्य होते. मूळ गावीच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. उडुपी पोलिसांनी शनिवारी कंत्राटदाराच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांची सविस्तर जबानी घेतली.

संतोषची आई, पत्नी व भावाची जबानी घेण्यात आली. संतोषचे कुटुंबीय उत्तरकार्यासाठी सध्या मूळ गावी आहेत. त्यामुळे पोलीस अधिकारी बडस के. एच. ला पोहोचले. सायंकाळपर्यंत जबानी घेण्याचे काम सुरू होते. संतोषचा भाऊ पोलीस निरीक्षक आहे. त्यांचीही जबानी घेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

गावकऱयांचेही मत जाणण्याचा प्रयत्न

उपलब्ध माहितीनुसार उडुपी पोलीस पथकातील काही अधिकाऱयांनी कुटुंबीयांची जबानी घेतली तर त्याचवेळी उडुपीहून आलेले साध्या वेशातील पोलीस गावात फिरून संतोषबद्दल गावकऱयांचे मत काय आहे? याचा कानोसा घेण्याचा प्रयत्न करीत होते. चौकशी पूर्ण करून सायंकाळी हे पथक उडुपीला रवाना झाले आहे.

Related Stories

आता खानापूर रस्त्याशेजारी पुन्हा खोदाई

Amit Kulkarni

पोलीस निरीक्षकाविरोधात वकिलांचे आंदोलन

Amit Kulkarni

हिंडलगा-मण्णूर मार्गावर धोकादायक एकेरी वाहतूक

Amit Kulkarni

चोरांनी नेले… कार्यकर्त्यांनी उभे केले!

Omkar B

लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाडय़ांना वाढता प्रतिसाद

Patil_p

रिंगरोडला आम्ही कदापीही जमीन देणार नाही

Patil_p
error: Content is protected !!