वृत्तसंस्था/ रॉटरडॅम
युफाच्या नेशन्स लिग फायनल्स स्पर्धेचे यजमानपद पहिल्यांदाच हॉलंड (नेदरलँडस्) भूषवित आहे. सदर स्पर्धा पुढील वर्षी घेतली जाणार असून नेदरलँडस्मधील रोटरडॅम आणि इनस्केडी या शहरामध्ये ही स्पर्धा खेळविली जाणार आहे.
या स्पर्धेतील उपांत्य फेरीचे सामने 14 आणि 15 जूनला तर तिसऱया स्थानासाठी प्ले ऑफ आणि अंतिम सामना 18 जूनला खेळविला जाईल. या स्पर्धेमध्ये यजमान नेदरलँडस्सह क्रोएशिया, इटली, स्पेन यांचा समावेश आहे. पोर्तुगाल, फुटबॉल संघाने 2021 ची युफा नेशन्स लिग फायनल्स स्पर्धा आपल्या घरच्या मैदानावर जिंकताना फिफाचा विश्व करंडक विजेता फ्रान्सचा पराभव केला होता.