Tarun Bharat

UGC चे निर्देश : 1 ऑक्टोबरपासून सुरु होणार नियमित सत्र

  • 30 सप्टेंबरपूर्वी पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया पूर्ण करा 


ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 


विद्यापीठ अनुदान आयोगाने महाविद्यालये आणि विद्यापीठांसाठी शैक्षणिक वेळापत्रक जारी केले आहे. त्यामध्ये महाविद्यालयाच्या पहिल्या वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया ही 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करावी जेणेकरुन 1 ऑक्टोबरपासून नियमित सत्र सुरु केले जाईल अशा प्रकारचे निर्देश दिले आहेत. 


शेवटच्या वर्षाच्या परीक्षा या 31 ऑगस्टपूर्वी घेणे आवश्यक असून त्या ऑनलाईन वा ऑफलाईन पद्धतीने घेण्यात याव्यात असे निर्देश विद्यापीठ अनुदान आयोगाने विद्यापीठांना दिले आहेत. इंटरमिडिएट विद्यार्थ्यांचे मूल्यांकन हे आधीच्या सेमिस्टरच्या आधारे करण्यात यावे, त्या संबंधी 2020 साली दिलेल्या गाईडलाईन्सचे पालन करावे असेही विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केले आहे. 


बारावीचा निकाल 31 जुलै रोजी लागणार आहे. या निकालानंतर महाविद्यालये आपली प्रवेश प्रक्रिया सुरु करु शकतात. जर काही कारणामुळे बोर्ड परीक्षेचा निकाल लांबला तर महाविद्यालये 18 ऑक्टोबर 2021 पर्यंत आपले शैक्षणिक सत्राला सुरुवात करण्याचे नियोजन करु शकतात असेही विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटले आहे.  

Related Stories

संपूर्ण भारतच प्रदूषित, WHO ने जाहीर केली वायू प्रदूषणाबाबत नवीन गुणवत्ता पातळी

Archana Banage

लाल टोपीला घाबरल्याने उद्घाटनांचा धडका ; जया बच्चन यांचे भाजपवर टीकास्त्र

Abhijeet Khandekar

केंद्रीय दक्षता आयुक्तपदी सुरेश पटेल

Patil_p

अर्णब गोस्वामी यांच्या विरोधात पुण्यात तक्रार; कारवाईची मागणी

datta jadhav

खंडेराया-म्हाळसा विवाहसोहळा संपन्न :विवाहसोहळा संपन्न

Abhijeet Khandekar

प्रजासत्ताकदिनी मोदींचा रस्ता पुन्हा अडवणार

datta jadhav