मुंबई
बिगर बँकिंग क्षेत्रातील कंपनी उज्जीवन फायनान्शीयलच्या समभागाच्या भावाने 52 आठवडय़ानंतर नवी उंची गाठली आहे. कंपनीचा समभाग गेल्या 6 महिन्यात 102 टक्के इतका वाढला असल्याचे दिसले आहे. उज्जीवनचा समभाग बुधवारी बीएसईवर इंट्राडेदरम्यान 200 रुपयांवर पोहचला असून तो 9 टक्के वाढलेला दिसला. याआधी 1 नोव्हेंबर 2021 मध्ये समभाग 191 रुपयांवर पोहचला होता.