Tarun Bharat

युक्रेनचा अन्नधान्यांच्या निर्यातीस प्रारंभ

Advertisements

कीव्ह / वृत्तसंस्था

काही दिवसांपूर्वी रशिया आणि युक्रेन यांच्यात अन्नधान्यांच्या निर्यातीविषयी करण्यात आलेल्या महत्वाच्या कराराअंतर्गत युक्रेनने अन्नधान्याची निर्यात सुरु केली आहे. गेल्या सहा महिन्यांमध्ये प्रथमच या देशाकडून धान्याने भरलेले एक जहाज ओडेसा बंदरातून पाठविण्यात आलेले आहे. या करारामुळे जगातील धान्यांची टंचाई काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रशिया आणि युक्रेनमध्ये गेले कित्येक महिने युद्ध सुरु आहे. युद्धात कोणत्याही देशाची निर्णायक सरशी होत नसल्याने ते प्रचंड लांबले आहे. युक्रेनहून युरोप आणि इतर देशांना अन्नधान्यांची मोठय़ा प्रमाणात निर्यात केली जाते. युद्धामुळे ही निर्यात ठप्प झाल्याने जगाच्या काही भागांमध्ये धान्य टंचाई निर्माण झाली होती. त्यामुळे जगभरात अन्नधान्यांच्या किमतीही वाढल्या होत्या. आता  हे संकट काही प्रमाणात तरी कमी होईल अशी आशा तज्ञांनी वाटत आहे.

22 जुलैला करार

रशिया आणि युक्रेन यांच्यात 22 जुलैला महत्वाचा आणि दिलासादायक करार झाला होता. या करारात तुर्कस्थान आणि संयुक्त राष्ट्रसंघाने मध्यस्थी केली होती. या करारामुळे आता 2 कोटी 20 लाख टन धान्य निर्यात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. हे धान्य रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांकडून निर्यात केले जाणार आहे. या निर्यातीत प्रामुख्याने गव्हाचा समावेश असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

मक्याची निर्यातही होणार

युक्रेन हा मक्याची निर्यात करणारा जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा देश आहे. हा मका प्रामुख्याने युरोपियन आणि आफ्रिकन देशांना निर्यात केला जातो. गेले काही महिने या मक्याची निर्यात थांबल्याने मोठी समस्या निर्माण झाली होती. काही देशांमध्ये मक्याचे दर गरिबांच्या आवाक्याबाहेरचे झाले होते.

Related Stories

दक्षिण आफ्रिकेच्या नाइट क्लबमध्ये 17 जणांची हत्या

Patil_p

फ्रान्समध्ये सार्वजनिक स्थळी मास्क अनिवार्य

Patil_p

अफगाण धोरणावर चीनची अमेरिकेवर टीका

Patil_p

दिग्गजांचे ट्विटर अकाउंट्स हॅक करून 17 वर्षीय मुलाने कमावले 1 लाख डॉलर

datta jadhav

चिनी लस केवळ 50 टक्के प्रभावी

Patil_p

हैदराबाद-दुबई विमानतळादरम्यान करार

Patil_p
error: Content is protected !!