Tarun Bharat

भारतीय महिला हॉकी संघाकडून युक्रेन पराभूत

वृत्तसंस्था /डब्लीन (आयर्लंड)

येथे सुरू असलेल्या 23 वर्षांखालील वयोगटाच्या युनिफर पंचरंगी महिला हॉकी स्पर्धेत भारतीय कनिष्ठ महिला हॉकी संघाने आपली घोडदौड कायम राखताना बुधवारी झालेल्या सामन्यात युक्रेनचा 3-0 अशा गोलफरकाने एकतर्फी पराभव केला.

Advertisements

या सामन्यात भारतातर्फे निकिता टोप्पोने 33 व्या मिनिटाला, मंजू चौरासियाने 44 व्या तर ब्युटी डुंगडुंगने 55 व्या मिनिटाला गोल केले. युक्रेनच्या महिला संघाने सुरूवातीपासूनच आक्रमक आणि वेगवान खेळावर भर देताना पाचव्या मिनिटाला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळविला पण भारतीय गोलरक्षकाच्या शानदार कामगिरीमुळे युक्रेनचा हा पेनल्टी कॉर्नर वाया गेला. भारतीय संघाला स्थिर होण्यासाठी काही कालावधीची वाट पाहावी लागली. भारताने पाठोपाठ दोन पेनल्टी कार्नर मिळविले पण त्यांना त्याचा लाभ घेता आला नाही. सामन्यातील पहिल्या 15 मिनिटांच्या कालावधीत दोन्ही संघांना खाते उघडता आले नाही. भारताने दुसऱया 15 मिनिटांच्या कालावधीत युक्रेनच्या बचावफळीवर चांगलेच दडपण आणले. या कालावधीत भारताला एक पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो वाया गेला. मध्यंतरापर्यंत गोलफलक कोराच होता.

सामन्यातील 33 व्या मिनिटाला निकिता टोप्पोने मैदानी गोल नोंदवून भारताचे खाते उघडले. त्यानंतर युक्रेनला पेनल्टी कॉर्नर मिळाला पण तो वाया गेला. 44 व्या मिनिटाला मंजू चौरासियाने मैदानी गोल नोंदवून भारताची आघाडी 2-0 अशी वाढविली.

Related Stories

अहो आश्चर्यम्! नेटिझन्स चुकले! ‘ती’ महिला नव्हेच!

Patil_p

फेडरर, मेदवेदेव्ह, केर्बर, कॉर्नेट दुसऱया फेरीत

Patil_p

ऑस्ट्रेलियाच्या अँड्रय़ू सायमंड्सचा अपघाती मृत्यू

Patil_p

इंग्लंड-पाक दुसरी कसोटी आजपासून

Patil_p

युवराज सिंगची दिलगिरी

Patil_p

पुरुष दुहेरीत भारताला दोन कांस्यपदके

Patil_p
error: Content is protected !!