Tarun Bharat

युद्धादरम्यान भ्रष्टाचारामुळे युक्रेन जेरीस

उपसंरक्षणमंत्र्यांनी दिला राजीनामा ः सैनिकांसाठीच्या अन्नखरेदीत घोटाळा

वृत्तसंस्था  / कीव्ह

युद्धासोबत युक्रेनच्या लोकांना भ्रष्टाचार देखील त्रास देत आहे. सुमारे एक आठवडय़ापासून देशाचे अध्यक्ष वोल्दोमिर झेलेंस्की हे भ्रष्टाचार सामील मंत्री अन् अधिकाऱयांना राजीनामा द्यायला भाग पाडत आहेत. याचदरम्यान मंगळवारी युपेनचे उपसंरक्षणमंत्री याचेस्लाव शापोवालोव्ह यांना भ्रष्टाचाराशी निगडित एका प्रकरणात अडकल्यावर राजीनामा द्यावा लागला आहे. तर दुसरीकडे युक्रेनचे अध्यक्ष झेलेंस्की यानी पुढील आदेशापर्यंत वरिष्ठ अधिकाऱयांना देश सोडण्यास मनाई केली आहे.

 उपसंरक्षण मंत्र्यांच्या निर्देशावर संरक्षण मंत्रालयाने अन्नसामग्रीचा करार तीनपट अधिक महाग दरांवर केल्याचा आरोप आहे. परंतु उपसंरक्षणमंत्री शापोवालोव्ह यांनी स्वतःवरील सर्व आरोप फेटाळले आहेत. संरक्षण मंत्रालयाने 2 हजार कोटी रुपयांच्या अन्नसामग्रीच्या करारावर स्वाक्षरी केली होती.

संरक्षण मंत्रालयाने सैनिकांसाठी अन्नसामग्री खरेदी केली होती, या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाला होता. राजधानी कीव्हच्या दुकानांमध्ये एक अंडी 15 रुपयांमध्ये मिळत असताना संरक्षण मंत्रालयाने त्यासाठी 37 रुपयांचा दर दिला होता. युक्रेनचे उपसंरक्षणमंत्री शापोवालोव्ह स्वतःच्या महागडय़ा आणि आलिशान कार्समुळेही वादात सापडले होते.

एक मंत्र्याला पदावरून हटविले

उपसंरक्षणमंत्र्यांपूर्वी युक्रेनचे डेप्युटी इन्फ्रास्ट्रक्चर मिनिस्टरचा राजीनामा घेण्यात आला होता. रशिया सातत्याने युक्रेनच्या पायाभूत सुविधांना लक्ष्य करत आहे. या हल्ल्यांमुळे अनेक महत्त्वपूर्ण इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. अशास्थितीत युक्रेन अशा इमारतींना पुन्हा जुने स्वरुप मिळवून देण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करत आहे. डेप्युटी इन्फ्रास्ट्रक्चर मिनिस्टर सिल लोजिंस्की यांनी यंत्रसामग्री खरेदी करारासाठी 3 कोटी 23 लाख रुपयांची लाच स्वीकारल्याचा आरोप आहे.

Related Stories

पाकमध्ये हिंदू शिक्षिकेचे बळजबरीने धर्मांतर

Patil_p

इस्राईलमध्ये 27 डिसेंबरपासून लसीकरणाला सुरुवात

datta jadhav

”सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदींनी केली प्रसारमाध्यमांची मुस्कटदाबी”

Archana Banage

ऑक्सफर्ड-अ‍ॅस्ट्राझेनेकाच्या कोरोना लसीची मानवी चाचणी पुन्हा सुरू

datta jadhav

गेब्रयेसस विलगीकृत

Patil_p

पाक सैन्याच्या विरोधात पोलिसांचं बंड

Omkar B