पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासह प्रिन्स चार्ल्स यांची घेतली भेट
लंडन / वृत्तसंस्था
युपेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमिर झेलेन्स्की यांनी बुधवारी अचानक ब्रिटनला भेट दिली. विमानतळावर पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांचे स्वागत केले. या भेटीचे छायाचित्र सुनक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. दोन्ही नेत्यांमध्ये पंतप्रधानांचे अधिकृत निवासस्थान ‘10 डाऊनिंग स्ट्रीट’वर चर्चा झाली. तसेच झेलेन्स्की यांनी ब्रिटीश संसदेतही भाषण केले. तसेच बकिंगहॅम पॅलेसमध्ये त्यांनी प्रिन्स चार्ल्स यांची भेट घेतली. द्वयींची ही पहिलीच भेट आहे.
ब्रिटनच्या संसदेत भाषण देताना झेलेन्स्की यांनी बुधवारी युपेनच्या ‘वॉर हिरो’च्या वतीने ब्रिटनच्या जनतेचे आभार मानले. युद्धाच्या पहिल्या दिवसापासून लंडन आमच्या पाठीशी उभे आहे. तुमच्या मदतीबद्दल तुमचे आभार कसे मानावे हे मला कळत नाही, असे ते म्हणाले. तसेच रशिया या युद्धात पराभूत होईल असा दावा करताना आपल्या विजयानंतर संपूर्ण जग बदलेल, असेही त्यांनी सांगितले. युद्धाची धग वाढल्यानंतर ब्रिटनचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आम्हाला मदत करण्यासाठी बऱयाच देशांना एकत्र आणले. गेल्यावषी फेब्रुवारीमध्ये रशियाच्या हल्ल्यानंतर युपेन, अमेरिका आणि ब्रिटन चांगले मित्र बनले आहेत, असेही झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले. तसेच ब्रिटनने रशियावरील ताज्या निर्बंधांचेही कौतुक केले.
झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात ब्रिटनकडून 14 चॅलेंजर टँकच्या मदतीबद्दल पंतप्रधान सुनक यांचे आभार मानले. अमेरिका आणि जर्मनीने युपेनला शस्त्रे पाठवण्याच्या घोषणेनंतर ब्रिटननेही 14 चॅलेंजर 2 रणगाडय़ांसह तोफखाना आणि हजारो राऊंड्स पाठवण्याची घोषणा केल्यामुळे युपेनच्या सैन्याला रशियाचा सामना करण्यास मदत होईल अशी अपेक्षा आहे.
झेलेन्स्की यांनी आपल्या भाषणात जागतिक व्यवस्था, मानवी हक्क आणि जगातील न्याय याबद्दलही भाष्य केले. जो कोणी हिंसाचार आणि दहशतवाद करतो त्याला जबाबदार धरले पाहिजे. युपेनला मदत करण्यासाठी पाश्चात्य देशांना आणखी लढाऊ विमाने उपलब्ध करून देण्याचे आवाहनही त्यांनी केले.