कीव्ह / वृत्तसंस्था
युपेनचे राष्ट्राध्यक्ष वोल्दोमीर झेलेन्स्की कार अपघातात जखमी झाले आहेत. युपेनच्या कीव्ह इंडिपेंडंट वृत्तपत्रानुसार, झेलेन्स्की यांना किरकोळ दुखापत झाली आहे. हा अपघात कधी झाला हे मात्र अहवालात सांगण्यात आलेले नाही. झेलेन्स्कीचे प्रवक्ते सेर्ही नाकीफोरोव्ह यांनीही अपघाताच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. झेलेन्स्की आपल्या वाहन ताफ्यातून जात असताना एक कार नियंत्रणाबाहेर गेल्याने ताफ्यातील काही वाहनांना धडक बसली. या अपघातानंतर झेलेन्स्की यांच्यासह त्यांच्या चालकाला रुग्णालयात नेण्यात आले. उपचारानंतर त्यांना डिस्चार्जही देण्यात आला. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.