Tarun Bharat

अल्टिमेट खो-खो स्पर्धा आजपासून

Advertisements

मातीतील खो-खो आता मॅटवरील मॉडर्न अवतारात, आज रंगणार दोन सामने 

पुणे / वृत्तसंस्था

येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात उद्घाटनाची अल्टिमेट खो-खो स्पर्धेला आजपासून (रविवार दि. 14) प्रारंभ होत असून यंदा पहिल्या हंगामात 6 प्रँचायझींचा सहभाग आहे. चेन्नई क्विक गन्स, गुजरात जायंट्स, मुंबई खिलाडीज, ओडिशा जगरनॉट्स, राजस्थान वॉरियर्स व तेलुगू योद्धाज हे सहा संघ मॅटवर आव्हान उभे करतील. खो-खोचा हा मॉडर्न अवतार चाहते उचलून धरतील, अशी आयोजकांची अपेक्षा आहे.

स्पर्धेच्या पूर्वसंध्येला विविध संघांचे कर्णधार, मुख्य खेळाडू आणि त्यांच्या प्रशिक्षकांनी स्पर्धेची तयारी आणि आपली उद्दिष्टय़े याबाबत पत्रकार परिषदेत प्रकाशझोत टाकला. खो-खो लीगचे आयुक्त, अल्टिमेट खो-खोचे सीईओ टेन्झिंग नियोगी, बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना याप्रसंगी उपस्थित होते.

‘खो-खो प्रत्येक भारतीयाच्या मनामनात रुजले आहे, हे लक्षात घेता आजचा क्षण विशेष महत्त्वाचा आहे. देशातील जवळपास प्रत्येक प्रशालेत खो-खोला विशेष महत्त्व आहे आणि हा मातीतील खेळ नव्या अवतारात उतरवताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे’, असे टेन्झिंग यांनी नमूद केले.

अमित पाटील, महेश शिंदे (चेन्नई क्विक गन्स), रंजन शेट्टी, अनिकेत पोटे (गुजरात जायंट्स), विजय हजारे, राजेश कुमार (कुमार खिलाडीज), दिपेश मोरे, मिलिंद चावरेकर (ओडिशा जगरनॉट्स), मजहर जमादार, अक्षय गणपुले (राजस्थान वॉरियर्स), प्रज्वल केएच, प्रतीक वाईकर (तेलुगू योद्धाज) या कर्णधार व महत्त्वाच्या खेळाडूंसह प्रशिक्षक मनोहारा सीए (चेन्नई), संजीव शर्मा (गुजरात), राजेंद्र सप्ते (मुंबई), अश्वनी कुमार शर्मा (ओडिशा), नरेंद्र कुंदर (राजस्थान), सुमित भाटिया (तेलुगू) यावेळी उपस्थित होते.

या स्पर्धेसाठी मागील महिन्यात 143 खेळाडूंची प्राथमिक यादी तयार करण्यात आली आणि त्यातून संघ निवडले गेले. याप्रसंगी बॉलिवूड अभिनेता अपारशक्ती खुराना म्हणाला, ‘आजच्या युगात प्रत्येकाला टोटल पॅकेजची गरज असते. मी चित्रपट, शो आणि ट्रव्हेल शो केले आहेत. पण, ज्यावेळी माझ्याशी या लीगबाबत संपर्क साधण्यात आला, त्यावेळी पहिल्या पाच मिनिटातच मला हा अनुभव अनोखा असेल, याची कल्पना आली आणि मी चटकन प्रस्ताव स्वीकारला’.

या अल्टिमेट खो-खो लीगचे पाच विविध भाषांमधून सोनी स्पोर्ट्स नेटवर्क वाहिनीतर्फे थेट प्रसारण केले जाणार आहे. रोज सायंकाळी 7 वाजता सामन्यांना सुरुवात होणार आहे. यंदा पहिल्या हंगामातील सलामी लढत गुजरात जायंट्स-मुंबई खिलाडीज यांच्यात होत असून चेन्नई क्विक गन्स-तेलुगू योद्धाज यांच्यात दुसरी लढत होईल. ही स्पर्धा दि. 4 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे.

Related Stories

सोनमचा प्रवास…सोनेपतमधील मदिना ते टोकियो ऑलिम्पिक!

Patil_p

इस्ट बंगाल संघाच्या प्रमुख प्रशिक्षकपदी फाऊलर

Patil_p

वेतन मर्यादा हटवण्याचा एटीकेचा प्रस्ताव

Patil_p

विट्याच्या पृथ्वीला पदार्पणातच इंटरनॅशनल गोल्ड

Abhijeet Shinde

आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर

Patil_p

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा नियोजित वेळी घेण्याचा निर्धार

Patil_p
error: Content is protected !!