Tarun Bharat

उमर अहमद इलियासी यांना वाय श्रेणीची सुरक्षा

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

सरसंघचालक मोहन भागवत यांना राष्ट्रपिता संबोधिणारे ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे प्रमुख उमर अहमद इलियासी यांना केंद्रीय गृह मंत्रालयाकडून वाय श्रेणीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. इलियासीने सुरक्षा पुरविल्याप्रकरणी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. अनेकदा मला धमक्या मिळाल्या आहेत. इंग्लंडमधील क्रमांकावरून फोन करण्यात यत असून जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचे इलियासी यांनी सांगितले आहे.

सरसंघचालक मोहन भागवत यांनी काही दिवसांपूर्वी इलियासी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी जात त्यांची भेट घेतली होती. भागवत यांच्यासोबत यावेळी संघाचे वरिष्ठ पदाधिकारी कृष्ण गोपाल, रामलाल आणि इंद्रेश कुमार होते. इलियासी यांच्यासोबत त्यांनी शांतता अन् सौहार्दाशी संबंधित मुद्दय़ांवर चर्चा केली होती. या बैठकीनंतर बोलताना इलियासी यांनी भागवत हे राष्ट्रपिता असून त्यांनी माझ्या घरी येणे माझ्यासाठी सन्मानाची बाब असल्याचे म्हटले होते.

Related Stories

स्वयंशिस्त-सजगता कोरोनाविरुद्धची मोठी ताकद!

Patil_p

विनापरवानगी पाणी प्यायल्याने केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

Abhijeet Khandekar

सीआरपीएफच्या सुरक्षा यंत्रणेत सुधारणा

Patil_p

दिल्ली मद्य धोरण घोटाळय़ात समीर महेंद्रूला ईडीकडून अटक

Patil_p

सवर्णांना आरक्षण : सर्वोच्च न्यायालय घटनात्मकता तपासणार

Patil_p

प्रेषित अवमान प्रकरण: नुपूर शर्माला अटक करा, ओवैसींनी पंतप्रधानांच्याकडे केली मागणी

Archana Banage