नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीमधील दंगली प्रकरणात तुरुंगात असलेले आणि जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचे (जेएनयु) माजी विद्यार्थी उमर खालिद यांना दिल्ली उच्च न्यायालयाने जमीन नाकारला आहे. न्यायमुर्ती सिद्धार्थ मृदुल आणि न्याय़मुर्ती रजनीश भटनागर यांच्या खंडपीठाने उमर खालिद यांच्या जामीन अर्जावर निकाल दिला.
२०२०च्या फेब्रवारी महिन्यात ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगलीच्या कटातील आरोपी असल्याचा उमर खालिदवर आरोप आहे. त्याच्यावर दहशतवादविरोधी कडक कायदा असलेल्या UAPA अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. १३ ऑक्टोबर २०२० पासून उमर खालीद हा तुरुंगात आहे.
अपीलकर्ता उमर खालीद हा शर्जील ईमाम यांच्यासह ईतर आरोपींच्या संप्रकात होता. याचिकाकर्त्यावरिल आरोप सिध्द झालेला नाही असे मानण्यास वाजवी कारणे नाहीत. असे खंडपीठाने आपल्या निकालपत्रात म्हटले आहे.

