वैभववाडी/प्रतिनिधी-
उंबर्डे – वैभववाडी राज्य मार्गावर मोटर सायकल व काँक्रीट मिक्सर वाहनात झालेल्या भीषण अपघात सख्ख्या बहीण भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शनिवारी सोनाळी वाणेवाडी येथे सकाळी ९.३० वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. मुख्तार महंमद थोडगे (१८ रा. कोळपे)व मोमीना उस्मानगणी नावळेकर (२२ रा. नांदगाव ता कणकवली) अशी मृतांची नावे आहेत. मुख्तार हा येथील अर्जुन रावराणे उच्च महाविद्यालयात १२ सायन्स च्या वर्गात शिकत होता. तर मोमीना ही विवाहित असून तिला दोन महिन्यांची मुलगी आहे.मुख्तार हा आजारी बहिणीला घेऊन वैभववाडी येथे डॉक्टर कडे जात होता.या अपघाताने कोळपे गावावर शोककळा पसरली आहे. अपघातानंतर मिक्सर वाहन चालक गाडी तेथेच सोडून पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अपघाताने राज्य मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.