Tarun Bharat

Ratnagiri : खेडमध्ये अनधिकृत खोके उभारण्याचा सिलसिला सुरूच

नगर प्रशासनाची हाताची घडी अन् तोंडावर बोट, शहर बनतेय अनधिकृत खोक्यांचे शहर

खेड प्रतिनिधी

शहरात अनधिकृत खोक्यांचा पश्न ऐरणीवरच आला आहे. यापूर्वी उभारण्यात आलेल्या अनधिकृत खोक्यांबाबत अद्यापही कारवाईच झालेली नसताना एकामागोमाग 1 अनधिकृत खोके उभारण्याचा सिलसिला सुरूच आहे. या खोक्यांवर कारवाई करण्यासाठी नगर पशासन मूग गिळून गप्प असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या अनधिकृत खोक्यांमुळे शहर बकाल होत चाललेले असतानाही पशासनाने हाताची घडी अन् तोंडावर बोट ठेवण्याची भूमिका घेतली आहे.

नगर परिषदेची कुठलीही परवानगी न घेताच रातोरात अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या खोक्यांवर गतवर्षी गणेशोत्सवानंतर कारवाई करण्याचे संकेत नगर पशासनाने दिले होते. मात्र, तत्कालीन मुख्याधिकारी पसाद शिंगटे यांची चिपळूण येथे पशासकीय बदली झाल्यानंतर हा विषय खितपतच पडला. त्यांच्या बदलीनंतर काही महिने मुख्याधिकारी पद रिक्त होते. त्यानंतर दापोलीचे मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांच्याकडे येथील नगर परिषदेचा अतिरिक्त कारभार होता. मात्र, या कालावधीतही अनेकांनी नगर परिषदेच्या जागांवर अतिकमण करत खोके उभारण्याचा सपाटा सुरूच ठेवला आहे.

Related Stories

कोकण रेल्वेसाठी प्राण गमावलेल्यांना वाहिली आदरांजली

Patil_p

रंगपंचमी साधेपणाने, बच्चे कंपनीने लुटला आनंद!

Patil_p

एसटी कर्मचाऱयांवर कारवाई पाहता प्रशासनाने सहकार्य ठेवा

Patil_p

भय इथले संपत नाही….

Amit Kulkarni

इंडिया स्टीलमध्ये फोट दोघांचा मृत्यू, एक गंभीर

Patil_p

चिपळुणात व्यापाऱयावर ऍट्रासिटीचा गुन्हा

Patil_p