मंत्री सुदिन ढवळीकर यांची माहिती : एकूण 31 कोटी रुपये होणार खर्च,रु. 400 कोटींचा मलनिस्सारण प्रकल्प
जगन्नाथ मुळवी /मडकई
मडकई मतदारसंघात एकूण रू. 31 कोटी खर्चून विजेचा प्रश्न कायम स्वरूपी निकालात काढण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्या टाकण्याचे नियोजन केले आहे. त्यासबंधीची निविदा काढलेली असून 8 ऑगस्टपूर्वी निवडणूक आचारसंहीता न लागू झाल्यास तीन पंचायत क्षेत्रात प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली जाईल. राहिलेल्या तीन पंचायतीत येत्या 7 महिन्यात कामाला सुरूवात केली जाईल. रू. 400 कोटी खर्चून मलनिस्सारण प्रकल्प ही राबवून पंचायत क्षेत्र स्वच्छ व सुंदर बनविले जाईल असल्याची माहिती विजमंत्री तथा मडकइं&चे आमदार सुदिन ढवळीकर यांनी दै. तरूण भारत प्रतिनिधींशी बोलताना दिली.
मडकई मतदारसंघ शेतीभाती व बागायतीनी वेढला असल्यामूळे विद्युत वाहीनीवर पावसात झाडाच्या फांद्या अथवा वृक्ष कोलमडून पडत असतात. त्यामूळे रात्री विज प्रवाह खंडित होतो. धुवाँधार पडणाऱया पावसात लाईनमॅनला काम करणे कठीण होते. शेतीतही पाणी भरल्यामूळे पाण्यात राहून काम करणे जीकीरीचे बनते. नागरिकांनाही डासांपासून भिती उद्भवते. विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. या सर्व गोष्टी निकालात काढण्यासाठी या भूमिगत वाहिन्या टाकण्यात येत आहेत.
आठ ऑगस्टपूर्वी शुभारंभ
बांदोडा व कवळे क्षेत्रातला अर्धाभाग, गावणे, वाडी तळावली, दुर्भाट, आडपई, आगापूर, उंडीर ते कवळे दोन खांब या सर्व भागात रू. 13 कोटी खर्चून भूमिगत वीजवाहिनी टाकण्याचे नियोजन केले होते. या कामाची निविदा काढलेली आहे. 8 ऑगस्टपूर्वी निवडणूक आचारसंहीता लागू न झाल्यास लवकरच कामाचा श्रीफळ वाढवून शुभारंभ केला जाईल. दुर्भाट फिडरवरून या भागांना विजप्रवाह दिला जात होता.
मतदारसंघ प्रकाशमान करण्याचे स्वप्न
कुंडई, मडकई व बांदोडय़ाच्या अर्ध्या क्षेत्रात येत्या 7 महिन्यात रूपये 18 कोटी खर्चून भूमिगत केबल टाकून मतदारसंघातील विजेचा प्रश्न कायम स्वरूपी निकालात काढला जाइं&ल. या कामाची निविदा लवकरच प्रसिध्द केली जाणार आहे. धोकादायक स्थितीत असलेले विद्युत खांब पडून अपघात घडण्यापूर्वीच तेथून ते हटवून नविन खांब घातले जाईल. सौर उर्जेवर चालणारे प्रकल्प मतदारसंघात राबविल्यामूळे मडकई मतदारसंघ प्रकाशमान होईल व आपण पाहिलेले मतदारसंघाचे स्वप्न लवकरच पुर्णत्त्वास जाईल, असे पुढे बोलताना मंत्री श्री. ढवळीकर यांनी सांगितले.
बांदोडय़ात मलनिस्सारण प्रकल्प
रु. 400 कोटी खर्चून मलनिस्सारण प्रकल्प बांदोडय़ात राबवून येथील स्वच्छता राखली जाईल. गोव्यातील कुठल्याच ग्रामिण भागात असा प्रकल्प राबविण्यात आलेला नाही. त्याम्ळे मडकई मतदारसंघ नशिबवान म्हणावा लागेल. कित्येकांनी स्नानगृह व शौचालयाचे पाणी गटारात सोडलेले आहे. साचलेल्या घाणीला वाट करून देण्यासाठी हा प्रकल्प खुपच उपयुक्त ठरणार आहे. त्यासाठी उंडीर भागातील नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहनही मंत्री श्री. ढवळीकर यांनी केले आहे. शौचालयाच्या टाक्या रिकाम्या करण्यासाठी रू. 8 हजार खर्च येतो. हा खर्च वाचवण्यासाठी बांदोडा भाग व कवळे ते रामनाथी पर्यंतचा भाग या प्रकल्पात समाविष्ठ करण्यात आलेला आहे. युवकांना कुणीही या कामासंबधी फुस लावत असल्यास कुणाचेही ऐकू नका, असे प्रकल्प होणे काळाची गरज आहे, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.
सार्वजनीक बांधकाममंत्री असताना ग्रामिण भागातील सर्व रस्त्याचे हॉटमिक्स डांबरीकरण करण्याचा निर्णय घेतला. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांनी या निर्णयासाठी मोलाचे सहकार्य केले म्हणूनच मडकई मतदारसंघ व गोव्यातील ग्रामीण भागातील रस्ते हॉटमिक्स डांबरीकरण होऊ शकले.
काम करणाऱयांनाच पंचायतींवर निवडून द्या
पंचायत निवडणूका हाकेवर येऊन पोहचलेल्या आहेत. काम करणाऱया व्यक्तींनाच पंचसदस्य म्हणून निवडून द्या. प्रत्यक्ष घटणास्थळी जाऊन काम करणारी माणसेच समाजासाठी झटत असतात. पंचसदस्य म्हणून मिरविणाऱयांना आणि कामाच्या बाबतीत शून्यता दाखविणाऱया माणसांना निवडून देऊ नका, अशी माणसे समाजाचे नुकसान करीत असतात. असे पूढे बोलताना मंत्री ढवळीकरांनी नागरिकांना आवाहन केले आहे.