सरकारी शाळेचा नवा उपक्रम
शाळेत विद्यार्थ्यांना गणवेशात येताना पाहिले असेल. परंतु सर्व शिक्षक एकसारख्या पोशाखात येत नाहीत. बिहारच्या गया जिल्हय़ात मात्र चित्र वेगळे दिसून येते. तेथे शाळेत केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षकही एकसारख्या पोशाखात येतात. येथील सरकारी शाळा अनेक लोकांसाठी प्रेरणा देणार ठरली आहे.
ही शाळा बिहारच्या गया जिल्हय़ातील नक्षलवादग्रस्त क्षेत्रात आहे. बांके बाजार येथील या सरकारी शाळेत शिक्षकही गणवेशात दिसून येतात. विद्यार्थीवर्ग निळय़ा रंगाचा शर्ट तर गडद निळय़ा रंगाच्या पँट अन् स्कर्टमध्ये दिसून आले. तर शिक्षकांनी गुलाबी रंगाचा शर्ट आणि काळय़ा रंगाची पँट परिधान केल्याचे दिसून येईल. शिक्षक आणि विद्यार्थी दररोज या गणवेशात शाळेत येतात. शिक्षक देखील शालेय गणवेशात येण्याचे प्रकार खूपच कमी आढळून येतात.
ट्विटरवर वृत्तसंस्थेने या शाळेची अनेक छायाचित्रे शेअर केली आहेत. आमच्या शाळेतील सर्व शिक्षक आणि इतर कर्मचाऱयांनी एकत्र बैठक घेतली. या बैठकीत केवळ विद्यार्थीच नव्हे तर शिक्षक आणि इतर कर्मचारीही गणवेशात शाळेत येतील असा निर्णय घेतला. माझ्या वैयक्तिक योगदानातून या कर्मचाऱयांना गणवेशाचा पहिला संच उपलब्ध केल्याचे मुख्याध्यापक नागेश्वर दास यांनी सांगितले आहे.