Tarun Bharat

मुरगोड स्पर्धेत युनियन जिमखानाला उपविजेतेपद

Advertisements

तेजल शिरगुप्पी हुबळी संघाला अजिंक्मयपद

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव

उत्तर कन्नडा, मुरगोड येथील चाणक्मय स्पोर्ट्स क्लब आयोजित 14 वर्षाखालील आंतरअकादमी क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात तेजल शिरगुप्पी अकादमी हुबळी संघाने युनियन जिमखाना संघाचा 4 गडय़ांनी पराभव करून अजिंक्मयपद पटकाविले. जिमखानाचा आशुतोष हिरेमठ याला उत्कृष्ट फलंदाज तर साईराज साळुंखेला उत्कृष्ट गोलंदाज पुरस्काराने गौरविण्यात आले.

मुरगोड येथे झालेल्या या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात युनियन जिमखानाने 25 षटकात 5 बाद 163 धावा केल्या. आशुतोष हिरेमठने 5 चौकार व 1 षटकारासह 76 तर स्वरूप साळुंखेने 35 धावा केल्या. तेजल शिरगुप्पी हुबळीतर्फे वैभव, प्रितम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना तेजल शिरगुप्पी संघाने 24.5 षटकात 6 बाद 164 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. प्रितमने 6 चौकारासह 45 तर वैभव करसण्णावरने 5 चौकारासह 42 धावा केल्या. युनियन जिमखानातर्फे स्वरूप साळुंखे व साईराज साळुंखे यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या तेजल शिरगुप्पी व उपविजेत्या युनियन जिमखाना संघाला आकर्षक चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाज आशुतोष हिरेमठ जिमखाना तर उत्कृष्ट गोलंदाज साईराज साळुखे यांना चषक देवून गौरविण्यात आले. या संघात अनमोल शिंदोळकर, साईराज साळुंखे, स्वरूप साळुंखे, समर्थ चौगुले, गौरव पाटील, सुमित भोसले, नवीन किटवाडकर, अभिनव शर्मा, सुमित पडलसगी, मिहिर मिरजी, आशुतोष हिरेमठ, महंमद हमजा आदी खेळाडूंचा समावेश आहे. उपविजेत्या युनियन जिमखाना संघाला जिमखाना अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रसन्ना सुंठणकर, ताहिर सराफ व परशराम पाटील यांनी अभिनंदन केले. या संघाला मिलिंद चव्हाण, सचिन साळुंखे व गौतम शेणवी यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Related Stories

आयटीआय कॉलेजचा प्राचार्य एसीबीच्या जाळय़ात

Omkar B

लाल-पिवळा हटवा; अन्यथा प्रत्येक चौकात भगवा

Patil_p

कंग्राळी बुद्रुक, शाहूनगरमध्ये कडक लॉकडाऊनला प्रतिसाद

Patil_p

मतमोजणीसाठी 12 खोल्यांची व्यवस्था

Amit Kulkarni

पूरग्रस्त म्हणून घरे द्या, पण वसती योजनेतून नको…

Patil_p

लोकमान्य ग्रंथालयाला पुस्तके भेट

Patil_p
error: Content is protected !!